देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सैन्याच्या वाहनांवर अतिरेक्यांचा हल्ला; 4 जवान शहीद तर 3 जवान जखमी
Jammu Kashmir Terrorist Attack: जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पूंछ जिल्ह्यात (Poonch District) गुरुवारी (21 डिसेंबर) सशस्त्र दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात चार जवान शहीद झाले आणि तीन गंभीर जखमी झाले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली. वाचा सविस्तर
LPG Price Reduced: LPG स्वस्त! 'या' ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर मिळणार 40-40 रुपयांची सूट
LPG Price : LPG सिलेंडर (LPG Cylinder) ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती (LPG Cylinder Prices) कमी केल्या आहेत. यानंतर आता 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या ग्राहकांना प्रत्येक सिलेंडरवर सुमारे 40 ते 40 रुपयांचा नफा मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बाबतीत, किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. वाचा सविस्तर
Weather Update : 'या' भागात पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रात गारठा वाढला; आजचं हवामान कसं असेल?
Weather Update Today : पाऊस जाता जाईना... डिसेंबर महिना संपत आला तरी पावसाने (Rain Update) मात्र, पाठ सोडलेली नाही. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण भारतात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या आठवड्याभरापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Rain Update) पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. हवामान विभागानुसार, पुढील तीन दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा, आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामधील काही भागांमध्ये दाट धुक्याचा इशारा आहे. महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, मात्र थंडी वाढणार असून कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर
सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहणार? काँग्रेसनं स्पष्टच सांगितलं
Sonia Gandhi and Mallikarjun Kharge Visit Ram Temple : नवी दिल्ली : अयोध्येत (Ayodhya) नव्या राम मंदिराच्या (Ram Temple) अभिषेक सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. कार्यक्रमाचे आयोजक श्री. रामजन्म तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीनं ज्येष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), मनमोहन सिंह (Manmohan Singh), मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Choudhary) आणि जेडी(एस) सुप्रीमो देवेगौडा यांनाही निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. वाचा सविस्तर
Indians In US h1b Visa Pilot Program: अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय; भारतीयांना सर्वाधिक फायदा
Indians In US h1b Visa Pilot Program: अमेरिकेच्या (America) बायडन सरकारनं (Joe Biden Govt) एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्याचा भारतीयांना (India) मोठा फायदा होणार आहे. अमेरिकन सरकारनं H-1B व्हिसाच्या देशांतर्गत नूतनीकरणासाठी पायलट कार्यक्रम सुरू केला आहे. 24 जानेवारीपासून हा उपक्रम सुरू होणार आहे. हा H-1B व्हिसा पायलट प्रोग्राम फक्त भारतीय आणि कॅनेडियन नागरिकांसाठी आहे. या अंतर्गत अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय आयटी प्रोफेशनल्स आणि कॅनडाच्या नागरिकांना फायदा होणार आहे. हा कार्यक्रम अशा कंपन्यांसाठी देखील आहे, ज्यांचे H-1B कर्मचारी कामासाठी परदेशात जाऊ इच्छितात. वाचा सविस्तर
Exam : 90 सेकंद आधी परीक्षा संपल्याने विद्यार्थी संतापले! थेट सरकारवरच गुन्हा दाखल, 12 लाखांची मागणी
South Korea Exam : परीक्षेदरम्यान (Exam) काही विद्यार्थी वेळ पूर्ण होण्यापूर्वीच पेपर जमा करतात, तर काहींचा पेपर वेळेत पूर्ण होत नाही. दक्षिण कोरियामध्ये (South Korea) परीक्षेसंदर्भात एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. परीक्षेचा पेपर वेळेआधी जमा करुन घेतला म्हणून थेट सरकारवर नुकसानभरपाईचा दावा ठोकला आहे. महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा (College Entrance Exam) नियोजित वेळेच्या 90 सेकंद आधी संपल्यामुळे विद्यार्थ्यांनी (Students) कोर्टात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारवर दावा ठोकत मोठ्या दंडाची नुकसानभरपाई म्हणून मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी सरकारकडून 20 दशलक्ष दक्षिण कोरियन वॉन म्हणजे अंदाजे 15,400 डॉलर भारतीय चलनातमध्ये ही रक्कम 12,81,537 रुपये आहे. वाचा सविस्तर
Ind vs SA 3rd ODI Match Score: संजू सॅमसनचं शतक अन् गोलंदाजांची धमाकेदार खेळी; आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचा बोलबाला
India vs South Africa 3rd ODI Match Score: भारतीय क्रिकेट संघानं (Indian Cricket Team) दक्षिण आफ्रिकेत (South Africa) इतिहास रचला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं 78 धावांनी विजय मिळवला. यासह केएल राहुलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघानं आफ्रिकेला त्याच्या घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत 2-1 नं पराभूत केलं. या सामन्याचा हिरो संजू सॅमसन होता, त्यानं शानदार खेळी करत शतक झळकावलं. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला लक्ष्याचा पाठलाग करूच दिला नाही. या विजयासह टीम इंडियानं इतिहास रचला. वाचा सविस्तर
22 December In History : राष्ट्रीय गणित दिन, भारतात पहिली मालगाडी धावली, पठ्ठे बापूराव यांचे निधन; आज इतिहासात
22 December In History : 22 डिसेंबरचा दिवस इतिहासात अनेक मोठ्या घटनांनी नोंदवला गेला आहे. आजच्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबर 1666 रोजी शिखांचे 10 वे गुरू गोविंद सिंग यांचा जन्म झाला. भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मही आजच्या दिवशी झाला. प्रसिद्ध लावणी लेखक श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा पठ्ठे बापूराव यांचे निधन आजच्या दिवशी झाले. वाचा सविस्तर
Horoscope Today 22 December 2023 : आजचा शुक्रवार खास! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या
Horoscope Today 22 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 22 डिसेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना काही नवीन काम सुरू करायचे असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. आज कन्या राशीच्या लोकांना समाजात मान-प्रतिष्ठा नक्कीच मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.. वाचा सविस्तर