देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Ram Temple : राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा, शिव मंदिरात दर्शन; कसा असेल पंतप्रधानांचा कार्यक्रम? जाणून घ्या


PM Modi Ayodhya Visit : अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी (Pran Pratistha) अवघे काही तास उरले आहेत. सर्व भक्तगण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आतूर झाले आहेत. 22 जानेवारीला रामललाची (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha)  सोहळा पार पडणार असून सर्वत्र याचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांच्यासह सुमारे 8000 पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी पंतप्रधान मोदींचा दौरा कसा असेल याचं वेळापत्रक समोर आलं आहे. वाचा सविस्तर...


Weather Update : थंडी आणि धुक्यापासून सुटका नाहीच! पुढील 48 तासांत थंडीचा कडाका वाढणार


IMD Update Weather Forecast : उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. गेल्या 24 तासांत देशात विविध भागांत तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीमध्ये थंडीसह (Winter) दाट धुक्याची चादर (Fog) पाहायला मिळत आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट (Cold Weather) येण्याचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. उत्तराखंडमध्येही थंडीपासून (Cold) लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ झाली आहे. वाचा सविस्तर...


Shoaib Malik : तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु असतानाच शोएब मलिकचा भीम पराक्रम; कोहली आणि रोहितला टाकलं मागे


Shoaib Malik Stats : पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्यासोबत निकाह केल्याचं समोर आलं आहे. यामुळे शोएब मलिक सध्या खूप चर्चेत आहे. एकीकडे तिसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे शोएबने मैदानात पराक्रम केला आहे. पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर शोएब मलिकने टी-20 क्रिकेटमध्ये मोठं स्थान मिळवलं आहे. शोएब मलिकने असा विक्रम रचला आहे, जो त्याच्या आधी जगातील फक्त एकच फलंदाज करू शकला आहे. वाचा सविस्तर...


Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदीच्या दरात घसरण; आज तुमच्या शहरातील दर जाणून घ्या


Gold Silver Rate Today, 21 January 2023 : आज सोने-चांदी खरेदी (Gold Price Today) करण्याच्या विचारात असाल तर, आजचा सोन्याचा चांदीचा दर (Silver Price Today) काय आहे हे जाणून घ्या. गेल्या काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ झाली आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज सोन्याची किंमत 100 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढली आहे. वाचा सविस्तर...


21 January In History : मधू दंडवते, सुशांत सिंह राजपूतचा जन्मदिवस, आज आलिंगन दिन, आज इतिहासात 


मुंबई : अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 20 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी भारताचे माजी रेल्वे मंत्री अर्थतज्ञ प्रा. मधू दंडवते यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली. त्यांचा जन्म 23 मार्च 1923 रोजी झाला होता.  बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांचा जन्मही आजच्याच दिवशी झालेला. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर...


Horoscope Today 21 January 2024 : आजचा रविवार खास! 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 21 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 21 जानेवारी 2024 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, वृषभ राशीच्या लोकांना आज आर्थिक बाबतीत थोडा त्रास सहन करावा लागू शकतो, सिंह राशीच्या लोकांनी आपल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करावा. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...