मुंबई : सचिन तेंडूलकरची लेक सारा तेंडूलकर (Sara Tendulkar) आणि भारतीय क्रिकेटवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्यातच आता शुभमन गिलची बहिण आणि सारा तेंडूलकर या दोघी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी साराने कॅमेऱ्यामध्ये बघून चेहरा लपवला.


खरंतर सारा आणि शुभमन यांच्या अफेरच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. पण ही नेमकी सारा कोण याचा नेटकऱ्यांना लागत नव्हता. त्यामुळे शुभमन गिलसोबत सारा अली खान आणि सारा तेंडूलकर या दोघींच्या नावाच्या चर्चा होत्या. पण काही दिवसांपूर्वी सारा अली खान हीने कॉफी विथ करण या शोमध्ये याबाबत खुलासा केला. म्हणून सारा अली हिच्या नावाला नेटकऱ्यांनी पूर्णविराम दिला. पण आता सारा तेंडूलकर आणि शुभमन गिलची बहिण एकत्र दिसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 


साराने लपवला चेहरा


सारा आणि शुभमनची बहिण एकत्र दिसल्यानंतर साराने तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलंय. दरम्यान या सगळ्यामुळे सारा आणि शुभमन यांच्यातील डेटच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय. 






मागील काही दिवसांपासून सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या नात्याची चर्चा होतेय. त्यातच त्यांचे अनेक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होते आहेत. त्यातच गिल आणि सारा अली तेंडुलकर डेटवर गेल्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याच्याच आधी सारा आणि शुभमन यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. पण ते डेटवर गेल्याचे फोटो समोर आल्यानंतर त्यांचं पॅचअप झाल्याच्या चर्चा देखील सुरु झाल्या होत्या. 


साराचं वैद्यकशास्त्राचं शिक्षण


सारा तेंडुलकरने लंडन विद्यापीठातून वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलं आहे. शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले. सारा तेंडुलकरचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 54 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. काही वर्षांपूर्वी सारा शाहिद कपूरसोबत डेब्यू करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यानंतर सचिन तेंडुलकरने हे वृत्त फेटाळून लावत आपली मुलगी सध्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले. आता सारा भविष्यात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


हेही वाचा : 


Main Atal Hoon : पंकज त्रिपाठीचा 'मैं अटल हूँ' ऑनलाईन लीक! अटल बिहारी वाजपेयींच्या बायोपिकची निराशाजनक सुरुवात; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन