PM Modi Ayodhya Visit : अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी (Pran Pratistha) अवघे काही तास उरले आहेत. सर्व भक्तगण प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आतूर झाले आहेत. 22 जानेवारीला रामललाची (Ram Lalla) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha)  सोहळा पार पडणार असून सर्वत्र याचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendr Modi) यांच्यासह सुमारे 8000 पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशी पंतप्रधान मोदींचा दौरा कसा असेल याचं वेळापत्रक समोर आलं आहे. 


पंतप्रधानांच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा


22 जानेवारील सोमवारी पंतप्रधान मोदी 10.25 वाजता अयोध्येत दाखल होतील. यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर उपस्थित असतील. येथून ते 10.55 वाजेच्या सुमारास राम मंदिरात दाखल होतील. 11 ते 12 वाजेदरम्यानचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी 12.05 वाजता अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक, प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करतील. यानंतर दुपारी 1 वाजता पंतप्रधान इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. राम मंदिरातील पूजेनंतर पंतप्रधान मोदी भगवान शंकराचं दर्शनही घेतील.


असा असेल पंतप्रधानांचा अयोध्या दौरा


दुपारी 12 वाजेच्या सुमारास पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल. रामललाची प्राणप्रतिष्ठा 12.55 वाजेपर्यंत सुरु राहील. त्यानंतर पंतप्रधान सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतील. अयोध्येमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 2.15 वाजेच्या सुमारास कुबेर टेकडीवरील शिव मंदिरात पूजा करतील आणि दर्शन घेतील. 


16 जानेवारीपासून राम मंदिरात रामललाच्या विधींना सुरुवात झाली आहे. राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार असून रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी केले जातील. 121 आचार्य हे विधी करत आहेत. यापूर्वी 17 जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाची मूर्ती आणण्यात आली होती. मूर्ती आत आणण्यापूर्वी गर्भगृहात विशेष पूजा करण्यात आली. यानंतर 18 जानेवारी रोजी गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.


16 जानेवारीपासून राम मंदिरात विधींना सुरुवात


16 जानेवारीपासून राम मंदिरात रामललाच्या विधींना सुरुवात झाली. राम मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जानेवारीपर्यंत विधी सुरू राहणार असून रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आवश्यक असलेले प्रत्येक विधी केले जातील. 121 आचार्य विधी करीत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण होईल. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान मोदी 11 दिवसांचं खास अनुष्ठान करत आहेत.