IMD Update Weather Forecast : उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. गेल्या 24 तासांत देशात विविध भागांत तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे. दिल्लीमध्ये थंडीसह (Winter) दाट धुक्याची चादर (Fog) पाहायला मिळत आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये थंडीची लाट (Cold Weather) येण्याचा इशारा हवामान खात्याने (IMD) दिला आहे. उत्तराखंडमध्येही थंडीपासून (Cold) लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता नाही. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ झाली आहे.


थंडीच्या कडाका वाढणार


आज, पूर्व उत्तर प्रदेशात बहुतेक ठिकाणी थंडीच्या कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पूर्व मध्य प्रदेशातील अनेक भागात, पश्चिम उत्तर प्रदेशच्या काही भागात तसेच हरियाणा आणि वायव्य राजस्थानच्या काही भागात तापमानात प्रचंड घट होण्याची शक्यता आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये तीव्र थंडीची लाट दिसून येत आहे. पूर्व मध्य प्रदेशातील काही भागात तसेच वायव्य राजस्थानमध्ये थंडीसह दाट धुक्याची चादर पसरली आहे.




अनेक भागांमध्ये तीव्र थंडीची लाट


आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत देशात थंडीचा कडाका आणखी वाढणार आहे. शनिवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत मागील 24 तासांत किमान तापमान पंजाब, हरियाणा-चंडीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम आणि मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागांमध्ये तापमान 6-10 °C नोंदवलं गेलं आहे.


पुढील 2 दिवस थंडी आणि धुक्यापासून सुटका नाही


सध्या उत्तराखंडमध्येही थंडीपासून लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. पुढील 24 तासांत काही भागात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि पश्चिम राजस्थानमध्येही अशीच स्थिती राहील. पुढील 2 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता असून त्यानंतर त्याची तीव्रता कमी होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयएमडी अयोध्येच्या हवामानावर विशेष लक्ष ठेवून आहे.