देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Ayodhya Ram Mandir : अयोध्यानगरी सजली! राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी होणार 'हे' विधी; पाहा संपूर्ण यादी


Ayodhya Ram Mandir : अयोध्येत भव्य राम मंदिरात रामलल्ला (Ramlalla) प्रतिष्ठापना (Pran Pratishtha) सोहळा आजपासून सुरु होणार आहे. आज 16 जानेवारीपासून रामलल्लाची म्हणजेच प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूप मूर्तीची पूजा सुरू होणार आहे. त्यानंतर 18 जानेवारीला गाभाऱ्यात रामलल्लाची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. 15 जानेवारीपासून राम मंदिरात विविध कार्यक्रम आणि विधींना सुरुवात झाली आहे. वाचा सविस्तर...


Weather Update : उत्तर भारतात हुडहुडी, दक्षिण भारतात पावसाचा अंदाज; वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल


Today's Weather Update : वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट (Cold Wave) परसली आहे. यासोबतच दाट धुके आणि अनेक भागांत बर्फवृष्टी (Snowfall) होताना दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पश्चिम उत्तर प्रदेशातील विविध भागात 'रेड' अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय हरियाणातील काही जिल्ह्यांमध्ये 'ऑरेंज' अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट आणि दाट धुक्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. वाचा सविस्तर...


IndiGo Flight : इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ, मुंबई विमानतळावरील VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?


IndiGo Flight Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social Media) विमान प्रवाशांचा (Flight Passengers) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सचे (Airlines) प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसूनच जेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, तर अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे नेमकं प्रकरण काय? दरम्यान, हा व्हिडीओ कसला आहे आणि नेमकी घटना काय याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या. वाचा सविस्तर...


Gold Rate Today : सोन्याला झळाळी, चांदी चकाकली! आज सोने-चांदीचा भाव काय? जाणून घ्या


Gold Silver Rate Today, 16 January 2024 : तुमच्यासाठी किंवा नातेवाईकांना भेटवस्तू देण्यासाठी तुम्ही आज सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, ही बातमी नक्की वाचा. सोने-चांदी खरेदी करण्यापूर्वी आज सोने-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) काही बदल झाला आहे का हे जाणून घ्या. तसेच आजचा सोने-चांदीचा भाव काय आहे, याबाबत सविस्तर माहिती वाचा. वाचा सविस्तर...


16th January In History : छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे निधन; आज इतिहासात


मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद करण्यात आली होती. 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.  समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचे निधन झाले होते. भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2003 रोजी रवाना झाली. बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले होते. इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या घटना घडल्या त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. वाचा सविस्तर...


Horoscope Today 16 January 2024 : आजचा मंगळवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 16 January 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 16 जानेवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? आजचं राशिभविष्य वाचा सविस्तर...