देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


Weather Today : पुढील 3 दिवस थंडीची लाट! हवामान खात्याने वर्तवला अंदाज


Weather Update Today : देशात आता थंडीचा (Winter) पारा आणखी घसरणार आहे. पुढील काही दिवसात देशातील तापमानात घट (Cold wave) होताना पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस उत्तरेकडील भागात थंडीतून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा भागात दाट धुक्याची चादर पसरली आहे. पहाटेच्या वेळेस दाट धुके आणि गारठ्यामुळे सकाळी घरातून बाहेर पडणं कठीण झालं आहे. वाचा सविस्तर 


BVR Astra Weapon System : एकच घाव अन् शत्रूचा नायनाट; स्वदेशी अस्त्र क्षेपणास्त्र वायू दलाच्या ताफ्यात दाखल


BVR Astra Weapon System : नवी दिल्ली : भारतीय वायूदलाला रविवारी पहिलं स्वदेशी अस्त्र मिसाईल (ASTRA BVR) मिळालं आहे. अस्त्र मिसाइल हे हवेतून हवेत मारा करणारं स्वदेशी क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र Beyond Visual Range Attack करण्यास सक्षम आहे. या अस्त्र क्षेपणास्त्राची तेजस या लढाऊ विमानातून यशस्वी चाचणी करण्यात आलेली. अखेर रविवारी वायू दलात हे मिसाईल सामील करण्यात आलं. महत्त्वाचं म्हणजे, हे क्षेपणास्त्र व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे डागलं जातं. म्हणजेच जिथे पायलट पाहू शकत नाही, तिथेही हे क्षेपणास्त्र अचूक हल्ला करतं आणि विनाश घडवतं. गेल्या वर्षीच तेजस या लढाऊ विमानातून क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती... वाचा सविस्तर 


Munawwar Rana Passed Away : शब्दांचा जादूगार हरपला! लोकप्रिय कवी मुनव्वर राणा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Munawwar Rana Passed Away : आपल्या आवाजाने चाहत्यांना भुरळ घालणारे शब्दांचे जादूगार, लोकप्रिय उर्दू कवी मुनव्वर राणा (Munawwar Rana) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी लखनौच्या पीजीआय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली... वाचा सविस्तर 


पत्नीचं पाचवं लग्न चौथ्या पतीच्या जिव्हारी; संतापाच्या भरात भरभर पेट्रोल ओतलं अन् पेटवून घेतलं, उपचारादरम्यान मृत्यू


Crime News: भोपाळ : पत्नीच्या पाचव्या लग्नामुळे उद्भवलेल्या वादातून पतीनं गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशात (Madhya Pradesh Crime News) घडली आहे. गेल्या आठवड्यात इंदूरमध्ये (Indore Crime News) पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्यानं हे पाऊल उचललं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे... वाचा सविस्तर 


Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात दिलासा! आज तुमच्या शहरातील लेटेस्ट भाव काय? जाणून घ्या


Gold Silver Rate Today, 15 January : पुढच्या महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त आहेत, यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोनं महाग झालं असलं, तरी मागणी काही कमी झालेली नाही. आज मात्र सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत (Gold Rate Today) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 5,800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,327 रुपये प्रति ग्रॅम आहे... वाचा सविस्तर 


Tesla in India: भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा प्लान; प्लांट, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरही निर्मिती करणार


New EV Policy: जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार (Electric Vehicle) निर्माती कंपनी टेस्लानं (Tesla) भारतात गुंतवणुकीसाठी सुमारे 30 अब्ज डॉलर्स योजना तयार केली आहे. यासंदर्भात कंपनीची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू आहे. टेस्लानं भारतासाठी 5 वर्षांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. केंद्र सरकारचं नवं ईव्ही धोरण लवकरच येणार असल्याची चर्चा आहे. टेस्ला सध्या नवं धोरण जाहीर होण्याची वाट पाहत आहे... वाचा सविस्तर 


AI Surgery : देशात पहिल्यांदाच रक्ताची गुठळी काढण्यासाठी AI शस्त्रक्रिया, 62 वर्षीय रुग्णाला जीवदान


AI Blood Clot Surgery : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर रुग्णालयांमध्येही वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) तंत्रज्ञान वापरून आता शस्त्रक्रिया करण्यातही डॉक्टरांना यश आलं आहे. रक्ताच्या गुठळ्या झालेल्या रुग्णावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence Technology) वापर करून यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. देशात पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसातील रक्ताच्या गुठळीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. पल्मोनरी एम्बोलिझमने ग्रस्त असलेल्या 62 वर्षीय रुग्णावर गुडगावमधील एका खाजगी रुग्णालयात एआय तंत्रज्ञानाद्वारे (AI Technology) यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या आजारात फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या तयार होतात... वाचा सविस्तर 


ED Arrest Ajay Mittal: 56 हजार कोटींचं प्रकरण; ईडीची मोठी कारवाई, अजय मित्तल यांच्यासह पाच आरोपी अटकेत


ED Arrest Ajay Mittal: केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयानं (ED) 56 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीनं या प्रकरणाशी संबंधित पाच प्रमुख आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण मेसर्स भूषण स्टील लिमिटेड कंपनी आणि कंपनीशी संबंधित संचालकांसह इतर आरोपींविरोधातील आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर कंपनीशी संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली. ईडीनं अटक केलेल्या आरोपींना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यानंतर या सर्व आरोपींची कसून चौकशी करता यावी यासाठी ईडी न्यायालयाकडून कोठडीची मागणी करणार आहे... वाचा सविस्तर 


15 January In History: वर्णद्वेषाविरोधी लढणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग आणि ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्म, भारतीय लष्कर दिन; आज इतिहासात


15 January In History: जगासह भारताच्या इतिहासात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी वर्णद्वेषाविरोधात लढा देणाऱ्या मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांचा जन्म झाला होता. तसेच भारतासाठी पहिले ऑलिम्पिक मेडल आणणाऱ्या खाशाबा जाधव यांचा जन्मही आजच्याच दिवसाचा... वाचा सविस्तर 


Horoscope Today 15 January 2024 : आज मकर संक्रांत! 12 राशींसाठी आजचा दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 15 January 2024 : आज मकर संक्रांत! राशीभविष्यानुसार आज 15 जानेवारी 2024 रोजी सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीच्या तरुणांना आजच्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कर्क राशीच्या लोकांनी आज बाहेरचे अन्न खाणे टाळावे, अन्यथा तुमचे पोट खराब होऊ शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर