ED Arrest Ajay Mittal: केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयानं (ED) 56 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीनं या प्रकरणाशी संबंधित पाच प्रमुख आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण मेसर्स भूषण स्टील लिमिटेड कंपनी आणि कंपनीशी संबंधित संचालकांसह इतर आरोपींविरोधातील आहे. या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर कंपनीशी संबंधित पाच आरोपींना अटक करण्यात आली. ईडीनं अटक केलेल्या आरोपींना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यानंतर या सर्व आरोपींची कसून चौकशी करता यावी यासाठी ईडी न्यायालयाकडून कोठडीची मागणी करणार आहे. 

56 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण नेमकं काय? 

56 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या प्राथमिक तपासासाठी केंद्रीय तपास संस्था एसएफआयओनं आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण ईडीनं ताब्यात घेतलं. मनी लॉन्ड्रिंगशी संबंधिक या प्रकरणाचा सध्या कसून तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्राथमिक तपासादरम्यान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी अनेक शेल कंपन्या स्थापन करुन बँकेतून घेतलेला पैसा त्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतलं होतं, त्यात तोटा दाखवण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात तपास यंत्रणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल आणि त्यांच्या अनेक साथीदारांचीही चौकशी केली जात आहे. 

56 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याच्या प्राथमिक तपासासाठी ईडी एसएफआयओचं आरोपपत्र 

केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 56 हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीनं या प्रकरणाशी संबंधित पाच प्रमुख आरोपींना अटक केली आहे. हा खटला मेसर्स भूषण स्टील लिमिटेड कंपनी आणि कंपनीशी संबंधित संचालकांसह इतर अशा आरोपींविरुद्ध होता. या प्रकरणाची कसून चौकशी केल्यानंतर कंपनीशी संबंधित 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ईडीनं अटक केलेल्या आरोपींना ईडीच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यानंतर या लोकांची चौकशी करता यावी यासाठी न्यायालयाकडून रिमांडची मागणी करण्यात येणार आहे.

56 हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचं प्रकरण नेमकं काय?

56 हजार कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्याच्या प्राथमिक तपासासाठी केंद्रीय तपास संस्था एसएफआयओनं आरोपपत्र दिलं होतं. त्यानंतर हे प्रकरण ईडीनं ताब्यात घेतलं. मनी लाँड्रिंगशी संबंधित या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील प्राथमिक तपासादरम्यान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यांच्या अनेक साथीदारांनी अनेक शेल कंपन्या स्थापन करून बँकेतून घेतलेला पैसा त्या शेल कंपन्यांच्या माध्यमातून वळवल्याची माहितीही समोर आली आहे. नंतर ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतलं होतं, त्यात तोटा दाखवण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात तपास यंत्रणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नीरज सिंघल आणि त्यांच्या अनेक साथीदारांचीही चौकशी करत आहे.

अटक झालेल्या आरोपींचं नावं

1. अजय मित्तल2. नितिन जौहरी (माजी CFO)3. अर्चना मित्तल (नीरज सिंघल यांची बहिण)4. प्रेम अग्रवाल (माजी उपाध्यक्ष)5. प्रेम तिवारी (माजी उपाध्यक्ष)

यानंतर बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेमध्ये फसवणूक झाली. किंबहुना, नंतर याप्रकरणी बँकेनं अनेक तक्रारीही दाखल केलेल्या. SFIO आणि नंतर तपास यंत्रणा ईडीनं या प्रकरणात उडी घेतली. ईडीनं याप्रकरणी गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर 2023 मध्ये राजधानी दिल्ली, भुवनेश्वर, कोलकाता, हरियाणा, मुंबईसह अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली होती.