Gold Silver Rate Today, 15 January : पुढच्या महिन्यापासून लग्नाचे मुहूर्त आहेत, यामुळे सोन्याला मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. सोनं महाग झालं असलं, तरी मागणी काही कमी झालेली नाही. आज मात्र सोने-चांदीच्या दरात (Gold Price Today) दिलासा मिळाला आहे. आज सोन्याची किंमत (Gold Rate Today) स्थिर असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 5,800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,327 रुपये प्रति ग्रॅम आहे.


सोन्याच्या आजचा दर काय? (Gold Silver Price)


आज 15 जानेवारी रोजी, सोमवारी सोन्याचा दर कायम असून (Gold Rate Today) त्यात कोणताही बदल झालेना नाही. आज 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 58,000 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 47,450 रुपये प्रतितोळा आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63,270 रुपये प्रतितोळा आहे. 


चांदीच्या दरातही स्थिर (Silver Price Today) 


आज सोन्याप्रमाणे चांदीचा दरही (Silver Rate Today) स्थिर आहे. आज एक किलो चांदी 76,500 रुपये आहे. 


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली -  दिल्लीत सोनं 63420 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 63760 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • पुणे - सोन्याचा आजचा दर 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate)

  • नाशिक - 24 कॅरेट सोने 63300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)

  • नागपूर - 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)

  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 63270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)


लग्नसराईत सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा


सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.