देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 


अटल सेतू आजपासून खुला, 2 तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत, टोल किती? कोणत्या वाहनांना नो एंट्री? जाणून घ्या A टू Z माहिती


Atal Setu Bridge :  महाराष्ट्रातला बहुप्रतिक्षित मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (Trans Harbour Link)  प्रकल्प म्हणजेच अटल बिहारी वाजपेयी स्मृती न्हावाशिवा अटल सेतू (Nhava Sheva Atal Setu) आजपासून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकार्पण झालं.  हा 'अटल सेतू' शनिवार 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे, असे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे... वाचा सविस्तर 


Ram Mandir Inauguration : रथ यात्रा काढणारे लालकृष्ण आडवणी भावूक , म्हणाले "नियतीने मोदींना आधीच निवडलं, 22 तारखेला..."


Ram Mandir Inauguration : माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी (Lal Krishna Advani) यांनी 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratistha ) कार्यक्रमाबद्दल आनंद व्यक्त केलाय.  भगवान प्रभू श्रीरामचंद्राचं भव्य मंदिर  (Ayodhya Ram Mandir) तयार करण्यासाठी नियतीने आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) निवड केली होती, असेही आडवणी म्हणाले आहेत... वाचा सविस्तर 


एकेकाळी अमेरिकेनं तिनदा नाकारला व्हिसा; भारतीय वंशाच्या अमेरिकेनं उद्योजकानं आज तिथेच उभारलंय 90 अब्ज डॉलर्सचं साम्राज्य


Indian American Sanjay Mehrotra: मुंबई : गुजरातमध्ये (Gujarat) सुरू असलेल्या 'व्हायब्रंट गुजरात समिट'मध्ये (Vibrant Gujarat Summit) सहभागी होण्यासाठी देश-विदेशातील अनेक उद्योजक भारतात आले आहेत. सध्या या समिटमध्ये सहभागी झालेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन उद्योगपतीची जोरदार चर्चा रंगली आहे. या उद्योगपतीचं नाव आहे, संजय मेहरोत्रा (Sanjay Mehrotra). एकेकाळी व्हिसा नाकारलेल्या अमेरिकेतच मेहरोत्रा यांनी आपलं मोठं साम्राज्य उभारलं आहे. मूळचे भारतीय वंशाचे असलेले मेहरोत्रा ​​हे अमेरिकन कंपनी मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ आहेत. मेहरोत्रा ​​यांची मायक्रोन टेक्नॉलॉजी कम्प्युटर मेमरी आणि कम्प्युटर डेटा स्टोरेज डिव्हायसेस तयार करण्याचं काम करते. ज्यामध्ये रॅम, फ्लॅश मेमरी आणि यूएसबी ड्राइव्ह यांचा समावेश होतो.... वाचा सविस्तर 


शत्रूचं ड्रोन एका क्षणात उडवणार, क्षेपणास्त्र डागण्यातही माहीर; शत्रूला धडकी भरवणारा देशाचा पहिला लाईटवेट टँक Zorawar


Indian Light Tank Zorawar : नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या स्वदेशी लाईट वेट टँक जोरावरच्या (Zorawar) डेवलपमेंट ट्रायल्स सुरू झाल्या आहेत. याच्या यूजर ट्रायल्सही एप्रिलपर्यंत सुरू करण्याचा डीआरडीओचा (DRDO) प्रयत्न आहे. दोन्ही ट्रायल्स भारतीय लष्कराकडून केल्या जाणार आहेत. डीआरडीओच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्वदेशी लाईट वेट टँकमध्ये इंजिन बसवण्यात आले असून सध्या 100 किलोमीटरपर्यंत हा टँक चालवून पाहण्यात आलेलं आहे.... वाचा सविस्तर 


Pankaj Tripathi : "मुकेश अंबानी अभिनेते असते तर त्यांना श्रीमंत उद्योगपतीची भूमिका मिळाली नसती"; पंकज त्रिपाठी 'असं' का म्हणाले?


Pankaj Tripathi on Mukesh Ambani : एक अभ्यासू अभिनेता अशी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांची ओळख आहे. 'मिर्जापूर','गँग्स ऑफ वासेपूर' किंवा 'बरेली की बर्फी' आणि 'गुंजन सक्सेना' असो वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून पंकज त्रिपाठी यांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) अभिनेते असते तर त्यांना श्रीमंत उद्योगपतीची भूमिका मिळाली नसती, असं वक्तव्य पंकज त्रिपाठी यांनी केलं आहे... वाचा सविस्तर 


शार्दूल-ईशानचा पत्ता कट, मोहम्मद शामीही संघाबाहेर, युवा खेळाडूला दिली संधी!


IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test) यांच्यामध्ये 25 जानेवारीपासून पाच सामन्याच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील संघामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. काही अनुभवी खेळाडूंना वगळण्यात आलेय. अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) आणि चेतेश्वर पुजारा (cheteshwar pujara) यांना संघात स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. या दोघांसाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झाले का? अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. दुसरीकडे खराब कामगिरी कऱणाऱ्या शार्दूल ठाकूर (shardul thakur) यालाही संघाबाहेर ठेवण्यात आलेय... वाचा सविस्तर 


13 January In History: अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म, मदन पुरी, प्रभाकर पणशीकर यांचे निधन; आज इतिहासात


मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा आणि अंतराळवीर राकेश शर्मा यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला आहे. मिकी माऊस चित्राच्या रुपात आले होतं तर आजच्याच दिवशी भारतात पोलिओचा अखेरचा रुग्ण आढळला होता.  हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मदन पुरी यांचे निधन निधन झाले होते. त्याचप्रमाणे ख्यातनाम अभिनेते प्रभाकर पणशीकर यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले. अभिनेता इम्रान खानचा 13 जानेवारी 1983 साली जन्म झाला होता... वाचा सविस्तर 


Horoscope Today 13 January 2024 : आजचा शनिवार खास! 12 राशींच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 13 January 2024 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 13 जानेवारी 2024 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीच्या लोकांना त्यांचा अडकलेला पैसा आज परत मिळू शकतो, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. तूळ राशीच्या लोकांचे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात, सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर