नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पुंछ येथे शुक्रवारी (दि.12) भारतीय जवानांच्या गाडीवर (Indian Army) दहशतवाद्यांनी (terrorists) हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. पुंछ (Poonch) जिल्ह्यातील खनेतर भागात शुक्रवारी (दि.12) दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या (Indian Army) वाहनावर हल्ला केला. त्यानंतर भारतीय जवानांनी (Indian Army) हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी फायरिंग केली.
जखमींबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही
दरम्यान, अद्याप हल्ल्यात कोणी जखमी झाले आहे का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अजूनही गोळीबार सुरुच आहे. किती दहशतवाद्यांनी (terrorists) हा हल्ला केलाय याबाबतही माहिती मिळू शकलेली नाही.
2021 पासून पुंछ भागात हल्ले सुरु
मीडिया रिपोर्ट्नुसार, पुंछमध्ये भारतीय जवानांचे वाहन एका डोंगराळ भागातून जात होते. यावेळी डोंगराळ भागातून जवानांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आलाय. या फायरिंगमुळे भारतीय लष्कराचे एक वाहन पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. पंजाब रेंजच्या अंतर्गत राजौरी आणि पुंछ हे सेक्टर 2003 पासून दहशतवाद्यांपासून मुक्त होते. मात्र, ऑक्टोबर 2021 नंतर या ठिकाणी दहशतवाद्यांनी मोठे हल्ले केले आहेत.
भारतीय जवानांकडून जोरदार प्रत्युत्तर
हल्ला झाल्यानंतर भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. अजूनाही भारतीय जवान फायरिंग करत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या हल्ल्यामागे किती दहशतवादी आहेत? याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही. मागील सात महिन्यांमध्ये भारतीय लष्करातील अधिकारी आणि कमांडो लक्षात घेता एकूण 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. या शिवाय मागील 2 वर्षांमध्येही या भागात अनेक भारतीय जवानांना धारातीर्थी पडावे लागले आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 35 पेक्षा जास्त जवान शहिद झाले असल्याची माहिती आहे.
इतर महत्वाच्या बातम्या