देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Coronavirus Updates: कोरोनानं पुन्हा धाकधूक वाढवली; गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या वाढली, हिवाळा जबाबदार?


Maharashtra Coronavirus Updates: कोरोना व्हायरसनं (Covid-19 Updates) संपूर्ण जगाला वेठीस धरलं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं (Corona) पाठ फिरवली आणि पुन्हा जगभरातील व्यवहार सुरळीत झाले आहेत. परंतु, आता पुन्हा एकदा कोरोनानं जगाची धाकधूक वाढवली आहे. हिवाळा (Winter 2023) सुरू झाला असून हळूहळू वातावरणातील गारवा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता कोरोनानंही (Maharashtra Covid Updates) डोकं वर काढलं आहे. वाचा सविस्तर 


Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, महाराष्ट्रासह 'या' भागात पावसाची शक्यता; शेतकऱ्यांवरील संकट कायम


Weather Update Today : देशभरात थंडीचा कडाका (Cold Weather) वाढताना दिसत आहे. पुढील 48 तासांत देशातील विविध भागात पावसाची रिमझिम (Rain Alert) पाहायला मिळणार आहे. मिचॉन्ग चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतात थंडी वाढताना दिसत आहे. तर दक्षिण भारतात पुढील 24 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्वेकडील भागात धुक्याची चादर पाहायला मिळणार असून तापमानातही घट झाल्याचं पाहायला मिळेल. वाचा सविस्तर 


अदानींच्या साम्राज्यात आणखी एका कंपनीची भर; 'ही' कंपनी विकत घेण्यासाठी लगबग, 4100 कोटींची बोली, शेअर्सही तेजीत


Adani Group Updates: अदानी समूह  (Adani Group) आता आणखी एक कंपनी आपल्या पंखाखाली घेण्यासाठी सज्ज झाला आहे. ज्यासाठी अदानी समूहानं 4100 कोटी रुपयांची बोली लावली आहे. अदानी पॉवरनं लॅन्को अमरकंटक पॉवरला (Lanco Amarkantak Power) 4100 कोटी रुपयांची सुधारित ऑफर सादर केली आहे. औष्णिक वीज कंपनी लॅन्को अमरकंटक सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहे. त्यामुळे अदानी समूहासोबत कंपनीची बोलणी सुरू असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरुन आहे. वाचा सविस्तर


Criminal Law Bill : गुन्हेगारी कायदा व्यवस्थेत सुधारणेची तीन विधेयके सरकारने मागे घेतली, स्थायी समितीची शिफारस


Parliament Winter Session : केंद्र सरकारने (Central Government) गुन्हेगारी कायद्यात (Criminal Law) सुधारणा करण्यासाठी लोकसभेत (Lok Sabha) सादर केलेली तीन विधेयके मागे (Criminal Law Bills) घेतली आहेत. देशातील गुन्हेगारी (Crime) न्याय व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने लोकसभेत तीन नवीन फौजदारी कायदा विधेयके सादर केली होती. दरम्यान, संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीनंतर सरकारने ही तीन विधेयके मागे घेतली आहेत. समितीच्या शिफारशींच्या आधारे बदल करून या विधेयकांच्या नवीन आवृत्त्या तयार केल्या जातील आणि त्यानंतर विधेयके पुन्हा सादर केली जातील. वाचा सविस्तर 


Gold Rate Today : लग्नसराईत सोन्याला मोठी मागणी! आज सोने-चांदीचा दर काय? जाणून घ्या


Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. यामुळे महागाईतही सोन्याला मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत होती. दिवाळीनंतरही सोन-चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. सोनं महाग झालं असलं, तरी मागणी काही कमी झालेली नाही. आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) किंचित घट झाली आहे. आज सोन्याची किंमत (Gold Rate Today) 220 रुपयांनी कमी झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 5,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,213 रुपये प्रति ग्रॅम आहे. वाचा सविस्तर 


Rijul Maini : भारतीय वंशाची रिजुल मैनी ठरली 'Miss India USA 2023'! 25 राज्यांच्या 56 सौंदर्यवतींवर केली मात


Miss India USA 2023 Rijul Maini : भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी रिजुल मैनीने (Rijul Maini) 'मिस इंडिया यूएसए 2023'चा (Miss India USA 2023) मान पटकावला आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकल्याने रिजुल मैनी सध्या चर्चेत आहे. जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वाचा सविस्तर 


Kartik Amavasya 2023: आज वर्षातील शेवटची अमावस्या; नवीन वर्षातील समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' उपाय, कार्तिकी अमावस्येचं विशेष महत्त्व


Kartik Amavasya : हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं. 2023 या वर्षातील शेवटची अमावस्या 12 डिसेंबरला, म्हणजेच आज आहे. कार्तिक महिन्याच्या  कृष्ण पक्षातील ही कार्तिकी अमावस्या (Kartiki Amavasya) आहे. अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि उपासनेने विशेष लाभ होतो. या वर्षातील शेवटची अमावस्या मंगळवारी येते आणि शास्त्रानुसार, जी अमावस्या मंगळवारी येते तिला भौमवती अमावस्या (Bhaumvati Amavasya) असंही म्हणतात. या शेवटच्या अमावस्येला पूजा केल्याने तुमचं येणारं वर्ष, 2024 हे सुख-समृद्धीचं जाईल. वाचा सविस्तर 


12th December In History : शरद पवार, 'थलैवा' रजनीकांतचा जन्मदिन, संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा इंदिरा गांधींचा धाडसी निर्णय; आज इतिहासात 


12th December In History : भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि भारतीय राजकारणात विविध पदे भूषवणाऱ्या शरद पवारांचा जन्मदिन. तसेच भाजपचे दिवंगत नेते रजनीकांत आणि चित्रपटसृष्टीचा थलैवा अशी ओळख असलेल्या रजनीकांत यांचाही आज जन्मदिन. या व्यतिरिक्त इतिहासात आज कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे पाहू... वाचा सविस्तर 


Horoscope Today 12 December 2023 : आजचा मंगळवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 12 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 12 डिसेंबर 2023, मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. आज कन्या राशीच्या लोकांनाही त्यांच्या समस्यांचे समाधान मिळू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया... वाचा सविस्तर