Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. यामुळे महागाईतही सोन्याला मोठी मागणी आहे. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत होती. दिवाळीनंतरही सोन-चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. सोनं महाग झालं असलं, तरी मागणी काही कमी झालेली नाही. आज सोन्याच्या दरात (Gold Price Today) किंचित घट झाली आहे. आज सोन्याची किंमत (Gold Rate Today) 220 रुपयांनी कमी झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 5,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,213 रुपये प्रति ग्रॅम आहे.


सोने-चांदीच्या दरात किंचित घट


आज 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर (18K Gold Rate Today) 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, 22 कॅरेट सोन्याची किंमत (22K Gold Rate Today) 56,950 रुपये प्रतितोळा आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (24K Gold Rate Today) 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यासोबतच आज चांदीच्या दरातही (Silver Price) घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर (Silver Rate) 75,800 रुपये आहे. सोमवारी हा भाव 76,000 रुपये आहे.


देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट सोन्याचा दर)



  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)

  • दिल्ली -  दिल्लीत सोनं 64350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)

  • कोलकाता - कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)

  • चेन्नई - चेन्नईत आज सोन्याचा दर 62730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)


महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)



  • पुणे - 62130 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)

  • नाशिक - 24 कॅरेट सोने 62160 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nashik Gold Rate)

  • नागपूर - 24 कॅरेट सोने 62130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Nagpur Gold Rate)

  • कोल्हापूर - 24 कॅरेट सोने 62130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolhapur Gold Rate)


लग्नसराईत सोने खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा


सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणुकीपासून वाचवू शकता. जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर सर्व प्रथम त्या दागिन्यांवर सहा क्रमांकाचा हॉलमार्क आहे का ते तपासा. नियमानुसार कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने विकू शकत नाही.