देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


सर्व राष्ट्रप्रमुख राजघाटावरील महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाला करणार अभिवादन; G20 च्या दुसऱ्या दिवसाचं वेळापत्रक


G20 Summit 2023: दोन दिवसीय G20 शिखर परिषदेत (G20 Summit 2023) सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक नेते आणि जागतिक संस्थांचे प्रमुख शनिवारी (9 सप्टेंबर) राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मंडपममध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अनेक नेत्यांचं स्वागत केलं. आज या G20 परिषदेचा दुसरा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर G20 च्या दुसऱ्या दिवसाचं निर्धारित वेळापत्रक पाहूया, त्या आधी बैठकीच्या पहिल्या दिवशी घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर देखील एक नजर टाकूया. वाचा सविस्तर


G-20 परिषदेत जागतिक जैवइंधन आघाडीची घोषणा, जागतिक ऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण : पंतप्रधान 


PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-20 शिखर परिषदेत  जागतिक जैवइंधन आघाडीची (जीबीए) घोषणा केली आहे. हा जागतिक ऊर्जा क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. जैवइंधनाचा वापर सुलभ करण्यासाठी सरकार, आंतरराष्ट्रीय संस्था आणि उद्योग यांची आघाडी विकसित करण्यासाठी जीबीए हा भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रम आहे. हा उपक्रम भारतासाठी अनेक आघाड्यांवर फायदेशीर ठरणार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. वाचा सविस्तर


उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटकसह 'या' राज्यांत पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता


IMD Weather Update : देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, सगळीकडे वातावरण आल्हाददायक झालं आहे. या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. राजधानी दिल्लीतही शनिवारी (काल) पावसानंतर वातावरणात बदल झाला असून येथेही आज पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंडसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाचा सविस्तर


Chandrayaan 3 : चंद्राच्या पृष्ठभागावर अंधारात पिवळ्या ताऱ्याप्रमाणे चमकतोय विक्रम लँडर! चांद्रयान-2 ऑर्बिटरने टिपले सुंदर दृश्य


Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर स्लीप मोडमध्ये आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 14 दिवसांच्या शोधानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्यास्तानंतर दोन्ही उपकरणे बंद करण्यात आली आहेत. मात्र सूर्योदयानंतर त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ISRO कडून सांगण्यात आलं आहे. या दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर अंधारात असलेल्या चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरची छायाचित्रे समोर आली आहेत जी आश्चर्यकारक आहेत. वाचा सविस्तर


श्री गणेशाची मूर्ती कशी असावी? मूर्तीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा...


मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानलं जातं. गणशोत्सवात लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं. सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते. यंदा 19 सप्टेंबरला गणेश चुर्तर्थीपासून गणेशोत्साला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे. यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या. श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार, काही नियम जाणून घ्या. वाचा सविस्तर


मेष, सिंह, कुंभसह 'या' राशीच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 10 September 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मेष राशीचे लोक आज आपल्या व्यवसायात काही मोठे लक्ष्य पूर्ण करतील. तर, वृषभ राशीच्या लोकांना आज आपल्या नोकरीत काही मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एकूणच मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा रविवार नेमका कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


जी -20 परिषदेचा दुसरा दिवस, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार सामना; आज दिवसभरात


मुंबई : नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या जी-20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. तर आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्यामुळे नागरिकांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहून बाहेर पडावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय. तर अजित पवार यांनी कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. वाचा सविस्तर


आज 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन'; वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व


World Suicide Prevention Day 2023 : जागतिक आरोग्य संघटनेने 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जाहीर केला असून कोरोना संकटकाळात या दिनाला फार महत्व आले आहे. संसार नीट चालला नाही, परीक्षेत मार्क कमी मिळाले, आर्थिक संकट आले या कारणांसोबतच आता आत्महत्यांची काही विचित्र कारणे समोर येत आहेत. याचबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो. वाचा सविस्तर