मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshostav 2023) अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वत्र लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानलं जातं. गणशोत्सवात लाडक्या बाप्पाला घरी आणलं जातं. सर्व विघ्नांचा नाश करणारा अशा विघ्नहर्त्याची मनोभावे पूजा केली जाते. यंदा 19 सप्टेंबरला गणेश चुर्तर्थीपासून गणेशोत्साला धूमधडाक्यात सुरुवात होणार आहे. यंदा लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्या. श्री गणेशाची मूर्ती कशी असावी आणि त्याबाबतचे शास्त्रानुसार, काही नियम जाणून घ्या.


श्री गणेशाची स्थापना करताना खालील गोष्टींची काळजी घ्या.


1. गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरी आणून तिची स्थापना केली जाते. मातीपासून बनवलेली गणेशमूर्ती पूजेसाठी शुभ मानली जाते. याशिवाय सोने, चांदी, तांबे इत्यादीपासून बनवलेल्या मूर्तीचीही तुम्ही स्थापना करु शकता. पूजेमध्ये केवळ प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवणं अशुभ मानलं जातं. त्यामुळे अशी मूर्ती घरात न आणण्याचा प्रयत्न करा.


2. गणपतीची मूर्ती खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी. डाव्या बाजूला असलेल्या सोंडेच्या गणपतीली वामुखी गणपती म्हणतात. वाममुखी गणपतीची मूर्ती घरी आणणे शुभ असते. डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे सोपे असतं, असं म्हटलं जातं. मात्र, उजव्या सोंडेच्या गणपतीच्या पूजेसाठी विशेष नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. असं मानलं जातं की, डाव्या बाजूला सोंड वाहणाऱ्या गणपतीच्या मूर्तीमध्ये चंद्राचा वास असतो आणि उजव्या बाजूला सोंड असलेल्या मूर्तीमध्ये सूर्याचा वास असतो.


3. सध्या लोक सर्व प्रकारच्या श्रीगणेशाच्या मूर्ती घरी आणू लागले आहेत. आपल्या बाप्पाची मूर्ती वेगळी असावी, अशी प्रत्येकाची असते. पण गणपतीची पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती असणे शुभ मानली जाते. त्यामुळे पांढऱ्या किंवा सिंदूर रंगाची मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न करा.


4. डाव्या बाजूला सोंड ठेवून मूर्तीची पूजा केल्यास धन, करिअर, व्यवसाय, संतान सुख, वैवाहिक सुख इत्यादींशी संबंधित साधकाच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. उजव्या बाजूला सोंड असलेल्या गणपतीला सिद्धिविनायक म्हणतात. ज्याची पूजा केल्याने भक्ताला त्याच्या शत्रूंवर विजय प्राप्त होतो आणि त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात.


5. ऑफिससाठी गणपती आणताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ऑफिस किंवा दुकानासाठी उभे असलेले बाप्पा जास्त शुभ मानले जातात. असे म्हणतात की अशा मूर्तीची पूजा केल्याने तुमच्या यशाची आणि प्रगतीची दारे उघडतात.


6. संतान प्राप्तीसाठी घरात गणपतीच्या बालस्वरूपाची प्रतिष्ठापना करावी. बालगणेश तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील.


7. गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाला तुमच्या घरी आणण्यापूर्वी, मूर्ती तुटलेली नाही याची खात्री करा. गणपतीच्या मूर्तीमध्ये उंदीर, एका हातात मोदक प्रसाद आणि दुसऱ्या हातात वरमुद्रा असावी, असे मानले जाते.


8. सिंहासनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती घरामध्ये पूजा करण्यासाठी खूप शुभ मानली जाते, म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं, म्हणून नेहमी सिंहासनावर किंवा घरातील कोणत्याही आसनावर बसलेल्या गणपतीची मूर्ती खरेदी करा.


9. वास्तूनुसार घरामध्ये गणेशाची मूर्तींची संख्या कधीही 3, 5, 7 किंवा 9 अशी असू नये. त्याऐवजी, तुम्ही 2, 4 किंवा 6 यासारख्या सम संख्येत गणपतीच्या मूर्ती घरात ठेवू शकता.


10. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर करणारी मानली जाते. वास्तूनुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गणपतीची मूर्ती समोर आणि उजवीकडे ठेवल्याने घराशी संबंधित सर्व प्रकारचे दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी नांदते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ganesh Chaturthi 2023 Vidhi : यंदा गणेश चतुर्थीला 2 शुभ योग, 'या' शुभ मुहूर्तावर श्री गणेशाची स्थापना करा; जाणून घ्या विधी...