Chandrayaan 3 : भारताचे चांद्रयान-3 चे विक्रम लँडर (Vikram lander) आणि प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर स्लीप मोडमध्ये आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 14 दिवसांच्या शोधानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सूर्यास्तानंतर दोन्ही उपकरणे बंद करण्यात आली आहेत. मात्र सूर्योदयानंतर त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं ISRO कडून सांगण्यात आलं आहे. या दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागावर अंधारात असलेल्या चांद्रयान-3 च्या विक्रम लँडरची छायाचित्रे समोर आली आहेत जी आश्चर्यकारक आहेत.


 


रात्रीच्या अंधारात चांद्रयान-3 च्या लँडरची अप्रतिम छायाचित्रे


5 सप्टेंबर 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या त्या भागात रात्र होती, जिथे चांद्रयान-3 चे विक्रम लँडर उतरवण्यात आले होते. चांद्रयान-2 चे ऑर्बिटर रात्रीच्या अंधारात चांद्रयान-3 च्या लँडरवर लक्ष ठेवण्यासाठी उतरविण्यात आले. ऑर्बिटरमध्ये बसवण्यात आलेल्या विशेष कॅमेऱ्याने रात्रीच्या अंधारात चांद्रयान-3 च्या लँडरची छायाचित्रे घेतली आहेत, ज्यामध्ये ते पिवळ्या प्रकाशात चमकताना दिसत आहे.






 


इस्रोकडून छायाचित्रे प्रसिद्ध
दरम्यान, विक्रम लँडरचा फोटो 6 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता. चित्रात चंद्राचा पृष्ठभाग निळा, हिरवा आणि गडद काळ्या रंगात दिसत आहे. दरम्यान, विक्रम लँडर पिवळ्या वर्तुळात दिसत आहे, पिवळ्या प्रकाश आपण आजूबाजूला सहज पाहू शकतो. येथे तीन चित्रे आहेत. डावीकडील पहिल्या उभ्या फोटोमध्ये, लँडर ज्या भागात उतरले ते मोठ्या भागात पिवळ्या चौकोनी बॉक्समध्ये दाखवले आहे. इस्रोने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.



रात्रीच्या अंधारात छायाचित्रे घेणारा खास DFSAR 
डीएफएसएआर हे एक विशेष यंत्र आहे, जे रात्रीच्या अंधारात हाय रिझोल्यूशन पोलरीमेट्रिक मोडमध्ये छायाचित्रे घेते. म्हणजेच, ते अंधारात धातूंमधून उत्सर्जित होणारी उष्णता आणि प्रकाश याचे छायचित्र टिपते. नैसर्गिकरीत्या घडणारा धातू असो किंवा मानवाने धातूपासून बनवलेली वस्तू असो, ती कॅमेऱ्यात टिपली जाते.



याआधीही चांद्रयान-2 ऑर्बिटरने काढले होते छायाचित्र 
चांद्रयान-2 ऑर्बिटर हाय रिझोल्युशन कॅमेरा (OHRC) ने सुसज्ज आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने 25 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान-3 चे छायाचित्र देखील घेतले. हे दोन फोटोंचे एकत्रीकरण होते, ज्यामध्ये डावीकडील फोटोत काहीच नाही दिसत आहे, तर उजव्या फोटोमध्ये लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर दिसत आहे. या चित्रात, लँडर झूम करून इनसेटमध्ये दाखवण्यात आले होते. 


संबंधित बातम्या


Chandrayaan 3 Mission: इस्रोची नवी अपडेट! चंद्राच्या पृष्ठभागावरील 3D छायाचित्र केले जारी, सोशल मीडियावर व्हायरल