देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


लैंगिक शोषण प्रकरणी ब्रृजभूषण सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कुस्तीगीरांचा निर्धार 


भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे.  दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 एप्रिलला एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    तसेच अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे. वाचा सविस्तर 


राहुल गांधींच्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात सुनावणी 


 काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज गुजरात उच्च न्यायालयात (Gujrat High Court)  सुनावणी होणार आहे.  सुरत सत्र न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात राहुल यांना दोषी ठरवण्याला स्थगिती देण्यास नकार दर्शवला. त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राहुल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. वाचा सविस्तर  


मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार , छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण 


अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे अनावरण करण्यात आलंय. आज मॉरिशस पंतप्रधान प्रविंदकुमार जगन्नाथ (Pravind Kumar Jugnauth) आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी अनावरण केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमला होता.  वाचा सविस्तर 


निर्मात्याने स्वतः सांगितले 32 हजार मुलींच्या लव्ह जिहादचे सत्य, ऐकून तुम्हालाही धक्का बसेल! 


 निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात 32,000 पीडित मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे, ज्यांना प्रथम लव्ह जिहादद्वारे इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि नंतर ISIS मध्येही सामील होण्यास भाग पाडले गेले. या चित्रपटालाही एक वर्ग विरोध करतोय. काही लोक म्हणतात की हा चित्रपट फक्त एक अजेंडा आहे. त्याच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, केरळमध्ये असे कधीच घडले नाही. यावर आता विपुल शहा उघडपणे व्यक्त झाले आहेत. वाचा सविस्तर


भारताचे 'एडिसन' डॉ. शंकर भिसे यांचा जन्म, अभिनेता इरफान खान यांचा स्मृतीदिन; आज इतिहासात 


इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व आहे.  29 एप्रिलचे ही महत्त्व आहे. या दिवशीदेखील काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस आहे. तर, महान भारतीय चित्रकार रवी वर्मा यांचा आज जन्मदिवस आहे. त्याशिवाय, भारताचे 'एडिसन' डॉ. शंकर भिसे यांचाही जन्मदिवस आहे. तर, अभिनेते इरफान खान यांचे निधन आजच्या दिवशी झाले होते.   वाचा सविस्तर 


आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा! कसा असेल तुमचा शनिवार? आजचे राशीभविष्य जाणून घ्या 


 आज शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. तर, वृश्चिक राशीसाठी करिअरची उत्तम संधी असेल. आजच्या दिवशी कोणत्या राशीला यश मिळेल? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर