Wrestlers Protest : भारतीय कुस्तीचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यत आला आहे. दिल्लीच्या कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 21 एप्रिलला एका अल्पवयीन मुलीसह सात कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा गंभीर आरोपांनंतर बृजभूषण सिंह यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान सुप्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. एसजी तुषार मेहता म्हणाले होते की, "दिल्ली पोलिस शुक्रवारीच एफआयआर दाखल करतील." मात्र रात्री उशिरा ब्रृजभूषण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासासाठी पोलिस परदेशात जाण्याची शक्यता
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिला अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत . हे सर्व अधिकारी ACP ला रिपोर्ट करतील आणि नंतर ACP - DCP ला रिपोर्ट करतील. एफआयआर नोंदवण्यासाठी नवी दिल्लीतील सुमारे 10 पोलीस अधिकाऱ्यांना ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली पोलिस तपासासाठी परदेशात देखील जाण्याची शक्यता आहे. जिथे पीडित कुस्तीपटूसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. त्याचबरोबर देशातील प्रत्येक राज्यात जिथे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे तिथे पोलीस देखील पोलीस जाण्याची शक्यता आहे. पीडित कुस्तीपटूंच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर असेल.
सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार
एफआयआर दाखल करण्यापूर्वी दिल्ली पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेतली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पोलिस सर्व पीडित कुस्तीपटूंचे जबाब नोंदवणार आहे. तसेच या प्रकरणी पोलिस संबंधित पुरावे गोळा करणार आहेत.
सन 2011 सालापासून कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद ब्रिजभूषण सिंह यांच्याकडे आहे. त्यांची तिसरी टर्म एका वर्षात संपणार आहे. आता चॅम्पियन कुस्तीपटूंनी असे गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याकडे हे पद राहतं का याचीही उत्सुकता आहे. तूर्तास हे सगळे आरोप चुकीचं आहेत. जे आरोप करतायत त्यांची कारकिर्द उताराला लागल्याचं आणि काही हेतूनं ते आरोप करत असल्याचा दावा त्यांनी केलाय
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Prashant Kadam Wide Angle 49: Raj Thackeray यांना नडणाऱ्या Brij Bhushan Singh यांचा गेम कोण करतंय?