देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...   


 केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात हाऊसबोट उलटल्यानं 21 जण दगावले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती 


 केरळमधील (Kerala) मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी (7 मे) संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. (वाचा सविस्तर


जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही, पंतप्रधान मोदींचा सुदानमधून कर्नाटकमध्ये परतलेल्या नागरिकांशी संवाद 


पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सुदानमधून कर्नाटकमध्ये परतलेल्या नाागरिकांशी संवाद साधला. ऑपरेशन कावेरीच्या (Opration Kaveri) माध्यमातून हक्की पिक्की जमातीच्या 210 जणांना सुदानमधून कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये आणण्यात आलं. जगात कुठेही भारतीय अडकला तर  झोप येत नसल्याचं मोदी या वेळी म्हणाले.  (वाचा सविस्तर


कर्नाटकात प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, पंतप्रधान मोदी आणि शाहांसह शिंदे-फडणवीसही प्रचारांच्या मैदानात 


 कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे ला मतदान होणार आहे...  विधानसभा निवडणुकीसाठी धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष - भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल  मतदारांना प्रचारसभांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न आज करतील (वाचा सविस्तर


टॉनिक म्हणून कोका-कोलाचा शोध, जर्मनीच्या शरणागतीनंतर दुसऱ्या महायुद्धाचा शेवट; आज इतिहासात 


वर्षभराप्रमाणे 8 मे चा दिवसही इतिहासातील अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी स्मरणात आहे. जगाच्या इतिहासात महत्त्वाच्या ठरलेल्या दुसऱ्या महायुद्धाचा शेवट आजच्याच दिवशी झाला होता. जर्मन हुकूमशहा हिटलरने आत्महत्या केल्याच्या एका आठवड्यानंतर, जर्मन जनरल आल्फ्रेड योडलने बिनशर्त आत्मसमर्पणाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीची औपचारिक घोषणा होईपर्यंत भौगोलिक परिस्थितीमुळे रशियामध्ये दुसरा दिवस होता, त्यामुळे 9 मे रोजी पहिले महायुद्ध संपल्याचा उत्सव साजरा करण्यात आला. (वाचा सविस्तर


 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होईल; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य 


 आज सोमवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. वृषभ राशीच्या लोकांच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तर तूळ राशीच्या बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. आज कुंभ राशीला सावध राहण्याची गरज आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर


2024 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये फक्त महिलाच सहभागी होणार; संरक्षण मंत्रालयाकडून सशस्त्र दलांना पत्र  


26 जानेवारी 2024 रोजी होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये कर्तव्यपथावर केवळ महिलांचा समावेश केला जाईल. परेड व्यतिरिक्त संचलन पथक, तबला आणि सांस्कृतिक कार्यक्रमात फक्त महिलाच दिसतील. संरक्षण मंत्रालयाने लष्करी दल आणि परेडमध्ये सहभागी असलेल्या इतर विभागांना पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत, ज्याचा उद्देश महिलांना नेतृत्व देणे आणि भविष्यातील नेतृत्वासाठी त्यांना तयार करणे आहे.  (वाचा सविस्तर


धगधगत्या मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात नाहीच, अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन


 देशाचे ईशान्येकडील राज्य मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. सशस्त्र जमामावकडून गावांवर हल्ले केले जात आहेत, घरे जाळत आहेत, दुकानांची तोडफोड केली जात असल्याने परिस्थिती धगधगती कायम आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी एनआयटी मणिपूरमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून अडचणीत सापडलेल्या या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. (वाचा सविस्तर