नवी दिल्ली : चीनमध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस घातक होत आहे. आतापर्यंत या व्हायरसने 803 जणांचा जीव घेतला आहे. तर 37 हजार लोकांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. तर दुसरीकडे जपानच्या योकोहामा बेटावर उभ्या असलेल्या क्रूज जहाज डायमंड प्रिंसेसमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. या क्रूजवर 130 हून अधिक भारतीय देखील अडकले आहे. स्वगृही परतण्यासाठी या सर्वांना 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.


जवळपास 3700 प्रवाशी या क्रूजवर आहेत. यामध्ये 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये 21 जपानी, 5 ऑस्ट्रेलियन, 5 कॅनडाचे आहेत. मात्र 3700 प्रवाशी जहाजवर असल्याने सर्वांना धोका निर्माण झाला आहे. या व्हायरसचा प्रसार वेगाने होण्याची भीती आहे. या अलिशान क्रूज जहाजावर उपस्थित भारतीयांसाठी सरकार सतत जपानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्वीट करत माहिती दिली की, जहाजात काही भारतीय प्रवासी आहेत. त्यांच्या माहितीसाठी आम्ही भारतीय दुतावासाच्या संपर्कात आहोत.


सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डायमंड प्रिंसेस क्रूजवर 3700 प्रवाशांमध्ये सहा भारतीय आहेत. तर जवळपास 130 कर्मचारी सदस्य भारतीय आहेत. समाधानकारक बाब म्हणजे सर्व भारतीयांचे कोरोना व्हायरसचे सर्व नमुने नेगेटिव्ह आले आहेत. मात्र अद्यापही हे सर्व भारतीय प्रिंसेस क्रूजवर असून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कोणतीही मोहीम भारताकडून राबवली जात नाही. मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांना 19 फेब्रुवारी पर्यंत जहाजावरच राहावं लागणार आहे. तोपर्यंत कुणालाही जहाजाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.


कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू



कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.


लक्षणे कोणती आहेत ?


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.


काय काळजी घ्याल?


तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.


संबंधित बातम्या :