पेईचिंग : कोरोना व्हायरसचा धोका सर्वप्रथम सांगणाऱ्या डॉक्टरांचा कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मृत्यू झालाय. ली वेनलियांग असं या डॉक्टरचं नाव आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनच ही माहिती दिलीय. वेनलियांग आणि इतर 8 जणांनी कोरोना नावाचा भंयकर विषाणू चीनमध्ये आल्याचं सर्वप्रथम सांगितलं होतं.


चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते.या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचं निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचं त्यांना आढळून आलं. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळं चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केलाय. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.


केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, मुख्यमंत्र्यांकडून राज्य आपत्तीची घोषणा


कोरोना व्हायरसवर औषध सापडल्याचा दावा -
थायलंडमधील आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्हायरस बाबत एक मोठं वक्तव्य केलंय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका चीनी महिलेवर थायलंडमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महिलेवर उपचार करणारे थाय डॉक्टर क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की 71 वर्षीय आजारी महिलेला अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा फायदा झाला आहे. या औषधाचा ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आलं आहे.


चीनमधील भारतीयांसाठी एअर इंडियाचे विशेष विमान -
चीनमध्ये प्राणघातक अशा कोरोना व्हायरसने आतापर्यंत पाचशेहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास 11,791 लोकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. चीनमधील वुहान शहरात या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. याठिकाणी शेकडो भारतीय लोक राहतात. या गंभीर परिस्थितीतून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाचं एक स्पेशल विमान पाठवलं होतं. हे विमान वुहान शहरातील 324 भारतीयांना घेऊन दिल्लीत आलंय.


Corona Virus | केरळमध्ये कोरोनाचा तिसरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला | ABP Majha