Corona Virus | केरळमध्ये कोरोनाचा आढळला दुसरा रूग्ण
एबीपी माझा वेब टीम | 02 Feb 2020 04:54 PM (IST)
करोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची शंका 304 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त फटका हुबेई प्रांताला बसला असून येथे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारपेक्षा अधिक लोकांना विषाणूची लागण झाली आहे.
नवी दिल्ली : जगभरात दहशत पसरवलेल्या कोरोना व्हायरसचा भारतात शिरकाव झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेला दुसरा रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. चीनमधून आल्यानंतर तपासणी केल्यानंतर या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. रुग्णाला डॉक्टरांच्या निगराणीखाली स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना व्हायरसची सुरुवात वुहान प्रांतातून झाली आहे. करोना व्हायरसमुळे चीनमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची शंका 304 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 45 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त फटका हुबेई प्रांताला बसला असून येथे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन हजारपेक्षा अधिक लोकांना विषाणूची लागण झाली आहे. चीनमध्ये प्राणघातक अशा कोरोना व्हायरसने आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 11,791 लोकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. चीनमधील वुहान शहरात या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. याठिकाणी शेकडो भारतीय लोक राहतात. या गंभीर परिस्थितीतून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाचं एक स्पेशल विमान पाठवलं होतं. हे विमान वुहान शहरातील 324 भारतीयांना घेऊन दिल्लीला आलं आहे. Corona Virus | चीनमधला कोरोना व्हायरस भारतात? रुग्णांनी आणि नागरिकांनी काळजी घ्यावी? कोरोना व्हायरसविषयी चुकीची माहिती परसवणाऱ्या पोस्ट काढून टाकण्याचा निर्णय फेसबुकनं घेतला आहे. चीनसह आणखी 12 देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत. अशामध्ये अफवांना आळा घालण्यासाठी फेसबुकनं हा निर्णय घेतला आहे. लक्षणे कोणती आहेत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. काय काळजी घ्याल? तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्यावे. संबधित बातम्या : कोरोना व्हायरस | एअर इंडियाचे विशेष विमान 324 भारतीयांसह चीनहून दिल्लीच्या दिशेने रवाना