एबीपीन्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेनुसार दिल्लीतील एकूण 70 विधानसभा जागांपैकी आम आदमी पार्टी (AAP) ला 51 ते 65 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. भाजपच्या खात्यात 3 ते 17 जागा तर काँग्रेसला 0 ते 3 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. सर्व्हेनुसार सरासरी आपला 58, भाजपला 10 आणि काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.
काय आहे पोल ऑफ पोलचा अंदाज
सर्व्हे एजन्सी / वाहिनी AAP BJP Congress
एबीपी-सी व्होटर 51-65 3-17 0-3
आज तक- एक्सिस माय इंडिया 59-68 2-11 0
रिपब्लिक- जन की बात 48-61 9-21 0-1
टाइम्स नाऊ-आयपीएसओएस 47 23 0
टीव्ही -9 आणि सिसरो 54 15 1
इंडिया न्यूज-नेता 53-57 11-17 0-2
पोल ऑफ एग्जिट पोल्स सरासरी 56 13 1
काय आहे एबीपी न्यूज सी व्होटरचा सर्व्हे
एबीपी न्यूज सी व्होटरच्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 5 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 0 ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.
Delhi Opinion Poll | दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, सर्वेचा अंदाज
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार
आम आदमी पक्ष - 51 ते 65 जागा
भाजप - 3 ते 17 जागा
काँग्रेस -0 ते 3 जागा
कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान
आप - 50.4
भाजप - 36
काँग्रेस - 9
इतर - 2.6
Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती
2015 च्या निवडणुकीत काय होती स्थिती
2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं.
माझा विशेष | 'गाली और गोली'नं दिल्ली जिंकता येईल? मुस्लीमांचे कैवारी पंतप्रधान मोदी गप्प का?