एक्स्प्लोर

मोहम्मद शमी त्यातला नाही, प्रशिक्षकांची प्रतिक्रिया

शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांनी शमीवरील आरोप फेटाळले आहेत.

लखनऊ: टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीच्या पत्नीने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. शमीचे अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप पत्नी हसीन जहांने केला आहे. इतकंच नाही, तर शमीच्या पर्सनल चॅटचे स्क्रीनशॉटही त्याच्या पत्नीने शेअर केले आहेत. या पोस्टनंतर शमीचे प्रशिक्षक बदरुद्दीन यांनी शमीवरील आरोप फेटाळले आहेत. प्रशिक्षकांची प्रतिक्रिया “मोहम्मद शमी हा खूपच लाजरा आणि एकटा एकटा राहणारा मुलगा आहे. मुलींसोबतचे संबंध तर दूरचाच विषय आहे. मी त्याला जवळून ओळखतो. त्याच्या पत्नीने जी पोस्ट लिहिली आहे, तसा शमी अजिबात नाही. जर काही वाद होते, तर ते बंद दाराआड मिटवायला हवे होते. मला वाटत नाही, त्यांच्यात इतके टोकाचे वाद होते. शमी आफ्रिका दौऱ्यावर होता, त्यावेळी माझं त्याच्याशी शेवटचं बोलणं झालं. आता पुढे भेटेल तेव्हा बातचीत होईल. मात्र शमी त्यातला नाही हा माझा विश्वास आहे” शमीची प्रतिक्रिया दरम्यान, या वादानंतर शमीने ट्विटरवर याबाबत आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. “माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल ज्या बातम्या येत आहेत, त्या सर्वस्वी खोट्या आहेत. हा माझ्याविरोधातील मोठा कट आहे. मला बदनाम करणं आणि माझं खेळावरुन लक्ष हटवण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे”, असं शमीने म्हटलं आहे. शमीच्या पत्नीची फेसबुक पोस्ट शमीची पत्नी हसीन जहांने मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून फेसबुकवर 11 खळबळजनक पोस्ट केल्या. शमीने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. मोहम्मद शमी सध्या धर्मशालामध्ये आहे. शमीच्या पत्नीने पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये काही महिलांचे फोटो आणि अश्लील चॅट दिसत आहेत. यापैकी कोणत्याही चॅटमध्ये शमीची ओळख पटत नाही. मात्र 'एबीपी आनंदो'च्या पत्रकार राजर्षी दत्ता गुप्ता यांनी हसीनजहांशी संपर्क साधला असता हे फेसबुक अकाऊण्ट आपलंच असल्याचं त्यांनी सांगितलं. 27 वर्षीय मोहम्मद शमीचं लग्न 2014 मध्ये झालं होतं. त्यांना आयरा ही मुलगी आहे. पोस्टमध्ये कोणाचा उल्लेख? हसीन जहांने नागपूर आणि पाकिस्तानातील काही महिलांचा उल्लेख केला आहे. फेसबुक पोस्टमध्ये संबंधित महिलांची नावं स्पष्ट दिसत आहेत. एका फोटोमध्ये तर सांबामध्ये राहणारी एक महिला शमीची गर्लफ्रेण्ड असल्याचा दावाही हसीनजहांने केला आहे. एक तरुणी 'आय मिस यू' असा मेसेज शमीला करते, त्यावर 'कम टू माय रुम' असा रिप्लाय तो करताना दिसत आहे. हसीनजहांचे आरोप मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हसीन जहांने अनेक गंभीर आरोप केले आहेत. शमीने सातत्याने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं ती सांगते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन परतल्यानंतरही त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला. शमी आणि त्याच्या कुटुंबाने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा हसीन जहांने केला. 'शमी अनेक महिलांसोबत अश्लील चॅट करायचा. जेव्हा त्याचा फोन माझ्या हाती लागला, तेव्हा तो 'लॉक' होता. मात्र वेगवेगळे पॅटर्न्स वापरल्यावर अखेर फोन अनलॉक झाला. अखेर मला या गोष्टींचा उलगडा झाला. शमीचे सगळे कॉल डिटेल्स आणि स्क्रीनशॉट्स माझ्या हाती लागले. आपला फोन गायब झाल्याचं समजताच तो चांगलाच भडकला होता.' असंही हसीन जहांने 'एबीपी'शी बोलताना सांगितलं. फेसबुक वॉलवरुन या पोस्ट डीलीट कराव्यात, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचंही हसीन जहांने सांगितलं. 8 जानेवारीला काय झालं? 'उत्तर प्रदेशमध्ये मला मारहाण केली जायची. माझं मानसिक आणि शारीरिक शोषण व्हायचं. शमीचं पूर्ण कुटुंब मला शिवीगाळ करत असे. सूर्योदयापासून रात्री दोन-तीन वाजेपर्यंत हा प्रकार चालायचा', असं तिने सांगितलं. जाधवपूर पोलिसात हिंसाचाराची माहिती दिली. 'कदाचित त्याच्या कुटुंबाने माझी हत्याही केली असती. त्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्नही केला' असं हसीन जहां सांगते. 'मी अजूनही पोलिसात तक्रार दिलेली नाही. 8 जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये मी घरगुती हिसांचाराची बळी पडले. त्यानंतर मी कोलकात्याला गेले आणि स्थानिक पोलिसात माहिती दिली. अद्यापही कायदेशीर कारवाईबाबत मी विचार करत आहे' अशी माहिती हसीन जहांने दिली. संबंधित बातम्या अनेक तरुणींशी शमीचे अनैतिक संबंध, पत्नीचा फेसबुकवर आरोप  मोहम्मद शमीवरील आरोपांवर बीसीसीआयची प्रतिक्रिया  

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
जगात सर्वात जास्त सोनं असणारे देश कोणते? भारताची स्थिती काय? जाणून घ्या देशांची यादी
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
मोठी बातमी! बंगालच्या उपसारगात मालवाहू जहाज बुडालं, 24 खलाशी अडकल्याची माहिती, बचावकार्य सुरु
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?
कांद्याला मोठी झळाळी! आठवडाभरात दरात 40 टक्क्यांची वाढ, शेतकऱ्यांना फायदा होणार का? तुमच्या शहरात काय दर?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget