एक्स्प्लोर
तिघांना अॅसिडने आंघोळ घालणारा शहाबुद्दीन जेलबाहेर, स्वागतासाठी 1300 गाड्यांचा ताफा
पाटणा: अॅसिडने आंघोळ घालून तिघांची निर्दयी हत्याकांड करणारा माजी खासदार आणि बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीन तब्बल 11 वर्षांनी जामीनावर सुटला आहे. आज सकाळीच त्याने जेलबाहेर पाऊल ठेवलं.
जेलबाहेर येताच शहाबुद्दीनच्या स्वागतासाठी एक- दोन नव्हे तर तब्बल 1300 गाड्यांचा ताफा आणि काही आमदार हजर होते. विशेष म्हणजे या गाड्यांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पोस्टर लावले होते.
मोहम्मद शहाबुद्दीन हा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचा खासदार होता.
2004 मध्ये अॅसिड अटॅक
16 ऑगस्ट 2004 मध्ये सीवान येथील व्यापारी चंद्रशेखर प्रसाद उर्फ चंदाबाबू यांच्या तिन्ही मुलांचे गिरीश, सतीश आणि राजीव यांचे अपहरण झाले होते. यातील गिरीश आणि सतीश यांना अॅसिडने आंघोळ घालून हत्या केली होती. तर यातील राजीव हा शहाबुद्दीनच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.
यानंतर गिरीशची आई कलावतीने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे शहाबुद्दीनविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र काही दिवसांनी या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार राजीववरही अॅसिड हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप शहाबुद्दीनवर होता.
नितीशकुमारांनी 2006 साली मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर शहाबुद्दिन यांना या प्रकरणावरून तुरुंगवास भोगावा लागला.
मात्र आज पाटणा उच्च न्यायालयाने त्याची तब्बल 11 वर्षांनी शनिवारी जामिनावर मुक्त केली. शहाबुद्दीनच्या स्वागतासाठी शहाबुद्दीन यांच्या समर्थकांसह राजदचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, आपल्याला खोट्या गुन्हामध्ये अडकावल्याचा आरोप जेलमधून बाहेर आलेल्या शहाबुद्दीन केला.
तर दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने सत्ताधाऱ्यांवर तोंडसुख घेतले आहे. या प्रकरणी सहा महिन्यांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश 13 फेब्रुवारी रोजी दिले होते. ते आरोपपत्र दाखल न झाल्याने आणि त्याच्या जमिनाला कोणताही विरोध झाला नाही. तसेच सरकारनेही हे प्रकरण एका कनिष्ठ वकिलाकडे सोपवल्याने शहाबुद्दीनची सुटका झाल्याचा आरोप, भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी नितीशकुमार सरकारवर केला आहे.
कोण आहे शहाबुद्दीन
10 मे 1967 रोजी सीवाना जिल्ह्यातील प्रतापपूरमध्ये जन्म
महाविद्यालयीन वयातच गुन्हेगारी क्षेत्राकडे वाटचाल
1986 साली शाहबुद्दीनवर पहिला गुन्हा दाखल
बिहारचा बाहुबली नेता मोहम्मद शहाबुद्दीनवर तब्बल 50 गुन्हे दाखल
1990 साली तरुंगातूनही अपक्ष निवडणूक लढवून जिंकली
चारवेळा खासदार, दोनवेळा आमदार राहिलेल्या शाहबुद्दीनला 8 खटल्यांमध्ये 2 वेळा जन्मठेप
2001 मध्ये खासदार असलेल्या शाहबुद्दीनने एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केली
बिहारमधील शेकडो समर्थकांकडून AK-47 जप्त
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement