एक्स्प्लोर

राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरल्यानंतर लालकृष्ण अडवाणी एकाकी?

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीपदाचा अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते, मात्र ते काहीसे एकाकी पडल्याचं चित्र पहायला मिळालं. अर्ज भरल्यानंतर भाजपच्या नेत्यांची फौज बाहेर आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या शेजारी लालकृष्ण अडवाणी आणि त्यानंतर रामनाथ कोविंद अशा क्रमानं चालत होते. मोदींनी शेजारीच असलेल्या अडवाणींना वगळून थेट पलिकडे असलेल्या कोविंद यांचा हात हातात घेतला आणि उपस्थितांना अभिवादन केलं. शेजारीच चालत असलेल्या अडवाणींचा त्यांना विसर पडल्याचं दिसलं. अखेर कोविंद यांनी मोदींना त्याची आठवण करुन दिली आणि अडवाणींचा हात मोदींच्या हातात दिला. मात्र यामुळे काहीशा दुखावलेल्या अडवाणींनी हलकेच आपला हात सोडवून घेतला. याची जाणीव झालेल्या मोदींनी झटकन अडवाणींचा डावा हात हातात धरुन उंचावला आणि वेळ निभावून नेली. पाहा व्हिडिओ :

रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल

खरं तर राष्ट्रपतीपदासाठी एनडीएतर्फे लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाची चर्चा होती. मात्र ऐनवळी रामनाथ कोविंद यांचं नाव पुढे आलं. सुरुवातीपासून मोदी-शाह यांनी भाजपच्या ज्येष्ठ फळीतील नेत्यांना दूर राखल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे अडवाणी आणि मोदी यांच्यातील दुरावा वारंवार समोर येताना दिसतो. प्रचंड शक्तीप्रदर्शनाद्वारे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजू शेट्टींसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे शिवसेनेची अनुपस्थिती. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हतं. कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या

राष्ट्रपती निवडणूक : काँग्रेसकडून मीराकुमार यांना उमेदवारी

रामनाथ कोविंद ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार! 

रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन

घटना बदलण्यासाठीच भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार : प्रकाश आंबेडकर

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांना नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार

Embed widget