एक्स्प्लोर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??

Modi Cabinet Reshuffle: 2029 लोकसभा निवडणुकीसाठी प्रादेशिक, जातीय समीकरणे साधण्यासाठी हा फेरबदल होत आहे. विशेषतः ओडिशा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला विस्तारात अधिक महत्त्व मिळण्याची चिन्हे आहेत.

Modi Cabinet Reshuffle: केंद्र सरकारमध्ये मोठा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल (Cabinet Reshuffle) होण्याची शक्यता आहे. हा विस्तार उद्या (30 जून) होईल, अशी वर्तवली जात आहे. या फेरबदलामध्ये अनेक दिग्गज मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काही अत्यंत धक्कादायक आणि नवीन चेहऱ्यांची एंट्री होऊ शकते. या फेरबदलात कामगिरीच्या आधारावर आणि राजकीय दबावामुळे काही बड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची दाट शक्यता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या राष्ट्रपती भवनातील लागोपाठच्या गाठीभेटींमुळे हा मंत्रिमंडळ विस्तार आता अंतिम टप्प्यात असल्याचे मानले जात आहे. 

किती मंत्र्यांची सुट्टी होऊ शकते?

  • धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षण मंत्री): देशातील राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या (NEET) कथित पेपर लीक वादामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्यावर प्रचंड राजकीय दबाव आहे. त्यामुळे या फेरबदलात त्यांची मंत्रिमंडळातून सुट्टी होऊ शकते, असे मानले जात आहे.
  • हरदीप सिंह पुरी (पेट्रोलियम मंत्री): हरदीप सिंह पुरी यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पक्ष संघटना किंवा अन्य जबाबदारीसाठी त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.

याशिवाय, ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही किंवा ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत, तिथले समीकरण साधण्यासाठी काही कनिष्ठ मंत्र्यांनाही डच्चू दिला जाण्याची शक्यता आहे.

किती नवीन चेहरे येऊ शकतात? 

  • शक्तिकांत दास (माजी गव्हर्नर, आरबीआय): रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव शक्तिकांत दास यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. त्यांना थेट मंत्रिमंडळात आणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
  • श्रीकांत शिंदे (खासदार, शिंदे गट): महाराष्ट्रातून महायुतीचे समीकरण मजबूत करण्यासाठी आणि शिंदे गटाला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे.
  • अरुण गोविल (खासदार, भाजप): 'रामायण' फेम आणि मेरठचे नवनिर्वाचित खासदार अरुण गोविल यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किती मंत्र्यांचे प्रमोशन होऊ शकते?

काही सध्याच्या मंत्र्यांनी आपल्या कामाची चमक दाखवली आहे, तसेच पक्षाच्या अंतर्गत गणितात त्यांचे स्थान मजबूत झाले आहे, अशा नेत्यांना प्रमोशन मिळू शकते

  • अनुराग ठाकूर: भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना कॅबिनेट रँकमध्ये अधिक महत्त्वाचे स्थान दिले जाण्याची शक्यता असून, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांना अधिक मोठ्या भूमिकेत आणले जाऊ शकते.
  • काही राज्यमंत्र्यांना (MoS) त्यांच्या चांगल्या कामगिरीचे बक्षीस म्हणून स्वतंत्र प्रभार (Independent Charge) किंवा थेट कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे.

किती मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात?

सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे सध्या मोठी जबाबदारी आहे, मात्र सूत्रांच्या हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, आरबीआयचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास देशाचे नवे अर्थमंत्री बनू शकतात.धर्मेंद्र प्रधान यांच्या संभाव्य एक्झिटनंतर, शिक्षण खात्याची धुरा निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, अशीही दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

याशिवाय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेल्या लागोपाठच्या बैठकांनंतर हे स्पष्ट झाले आहे की, अनेक बड्या मंत्रालयांच्या (उदा. पेट्रोलियम, उड्डयन, संरक्षण किंवा गृहनिर्माण) खात्यांमध्ये फेरबदल केला जाणार आहे. आगामी काळात होणाऱ्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकांची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून प्रादेशिक आणि जातीय समीकरणे साधण्यासाठी हा फेरबदल केला जात आहे. विशेषतः ओडिशा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांना या विस्तारात अधिक महत्त्व मिळण्याची चिन्हे आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Abhijit Dipke Detained : 'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
'सर, मी तर अजून कायदा मोडलाच नाही...', अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलीस ताब्यात घेतानाचा व्हिडीओ समोर
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Abhijeet Dipke : हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget