एक्स्प्लोर

बेपत्ता प्रवीण तोगडिया बेशुद्धावस्थेत, अहमदाबादेत उपचार सुरु

तोगडिया यांच्यावर सध्या अहमदाबादमधील चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अहमदाबाद : बेपत्ता झालेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडियांचा पत्ता लागला आहे. अहमदाबादमध्ये बेशुद्ध अवस्थेत ते सापडले. तोगडिया यांच्यावर सध्या अहमदाबादमधील चंद्रमणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. प्रवीण तोगडिया सकाळपासून बेपत्ता विश्व हिंदू परिषदेने आंतरराष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया बेपत्ता असल्याचा दावा केला आहे. समर्थकांनी आंदोलन करत प्रवीण तोगडिया यांचा शोध घेण्याची मागणी केली. राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडियांना ताब्यात घेतलं असल्याचा दावा विहिंप कार्यकर्त्यांनी केला आहे. प्रवीण तोगडियांना गुजरात पोलीस किंवा राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतलं नसल्याचा दावा गुजरात गुन्हे शाखेने केला आहे. अटक वॉरंट घेऊन पोलीस आले होते, मात्र तोगडिया सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. त्यांना अखेरचं काल रात्री अहमदाबादमध्ये रिक्षाने जाताना पाहिलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तोगडियांना पोलिसांनी अटक केल्याचा दावा दरम्यान, विहिंप कार्यकर्त्यांनी सोला पोलीस स्टेशनला (गुजरात) घेराव घातला, घोषणाबाजी केली आणि गांधीनगरला जाणारा रस्ता अडवत तातडीने प्रवीण तोगडिया यांचा शोध घेण्याची मागणी केली. प्रवीण तोगडिया सकाळी 10 वाजल्यापासून बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत याची माहिती ठेवणं आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असं विहिंपचे गुजरातचे महासचिव रणछोड भारवाड यांनी म्हटलं आहे. तोगडियांना अटक केली आहे किंवा नाही याची खात्री अजून झाली नसल्याचं भारवाड यांनी म्हटलं आहे. राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडिया यांना एका जुन्या प्रकरणात अटक केली असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते जय शाह यांनी केला आहे. प्रवीण तोगडिया यांना एका जुन्या प्रकरणात राजस्थान पोलिसांनी विहिंप मुख्यालयातून ताब्यात घेतलं आणि सोबत घेऊन गेले, असं जय शाह यांनी म्हटलं आहे. राजस्थान पोलिसांचं स्पष्टीकरण दरम्यान, ''राजस्थान पोलिसांनी प्रवीण तोगडियांना अटक केलेली नाही. माझ्या आदेशानुसार गंगापूर (राजस्थान) पोलिसांचं पथक त्यांना अटक करण्यासाठी गेलं होतं, मात्र ते न मिळाल्याने पोलीस माघारी परतले. त्यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली असल्याची अफवा आहे'', असं स्पष्टीकरण राजस्थानमधील भरतपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक आलोक कुमार वशिष्ठ यांनी दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget