मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. उद्या मध्यरात्रीपासून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्यीय विमान उड्डाणं बंद करण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता देशातील सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतूक विमाने सुरू असणार आहेत. या पूर्वी केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने विमान कंपन्यांना सांगितले आहे की, एअरलाईन्स कंपन्यांनी विमान उड्डाणांची नियोजनं अशा प्रकारे करावे की, 25 मार्च रोजी 12 वाजण्यापूर्वीच सर्व विमाने विमानतळांवर असावीत. त्यामुळे या दिवशी सर्व विमान कंपन्यांना त्यांचे देशातील प्रवासी निश्चित ठिकाणी रात्री बारा वाजण्याआगोदरच उतरावे लागतील. केंद्र सरकारन दिलेल्या निर्देशानुसार कार्गो एअरलाइन्सवर याचा परिणाम होणार नाही.
देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. ही भिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच आजपासून जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या दरम्यान मालगाड्या सुरू राहणार असणार आहे. याआधीच पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे तसेच कोकण रेल्वेने अनेक रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.
कोरोनाला सहज घेऊ नका
कोरोना व्हायरस देशात जास्त पसरला तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आपल्याकडे आहे का? असं राज ठाकरेंनी विचारलं. काल थाळीनाद, घंटानादाला लोक एकत्र बाहेर जमले होते. कोरोनाचं प्रकरण सहज घेऊ नका. 31 मार्चपर्यंत सरकारने लॉकडाऊन केलं असलं तरी लोक ऐकत नाहीयेत. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते, असा अंदाजही राज ठाकरेंनी वर्तवला.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- पुणे मनपा - 16
- मुंबई - 39
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 3
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- रायगड - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
संबंधित बातम्या :
Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद
Coronavirus | मास्क, हँड सॅनिटायझरच्या किमती केंद्र सरकारकडून निश्चित
Lockdown and Curfew | लॉकडाऊन आणि कर्फ्यू यामध्ये फरक काय?
Mumbai local shut down | Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, रेल्वेचा मोठा निर्णय