नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांना 1000 रुपये दंड आकारला जाईल किंवा 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे केंद्र सरकारने आपल्या निर्देशात स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोना विषाणूचा वाढती दहशत रोखण्यासाठी देशातील 23 राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. दिल्ली, उत्तराखंड, बिहार, महाराष्ट्र यासह अनेक राज्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्याच वेळी उत्तर प्रदेशमध्ये 25 मार्चपर्यंत 16 शहरांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लोकांना गर्दीत जाण्यापासून रोखणे लॉकडाऊन हा एकमेव उद्देश आहे. जेणेकरुन देशात कोरोना विषाणू स्टेज -3 मध्ये जाऊ नये. काही राज्यांमधून नियमांचे पालन न केल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यामध्ये लोक पूर्णपणे लॉकडाऊनचे पालन करताना दिसत नाहीत. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली लोक बाहेर फिरताना दिसतात आणि आता ही परिस्थिती टाळण्यासाठी केंद्र सरकारने परिपत्रकात जाहीर केले आहे. लॉकडाऊनबाबत लोक अजूनही गंभीर नाहीत : पंतप्रधान पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ट्विट केले ते म्हणाले, 'अजूनही बरेच लोक अजूनही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. ही चिंतेची बाब आहे कोरोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका. सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करा असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच देशातल्या सगळ्या राज्य सरकारांनी नियम आणि कायदे पाळावेतcoronvirus | लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई ; 1000 रूपये दंड किंवा 6 महिन्याची जेल
एबीपी माझा वेब टीम | 23 Mar 2020 04:22 PM (IST)