सर्वसामान्यांची होणारी लूट थांबावी यासाठी आता केंद्र सरकारनेच पाऊल उचलले आहे. यापूर्वीच राज्याने मास्क आणि हँड सॅनिटायझरचा अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश केला आहे. अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दोन आणि तीन प्लाय (ply) मास्कमध्ये वापरल्या जाणार्या फॅब्रिकची किंमत 12 फेब्रुवारी 2020 प्रमाणे निश्चित केली आहे. म्हणजेच 2 प्लाय (ply) मास्कची किरकोळ किंमत 8 रुपये. तर, 3 प्लाय (ply) मास्कची किंमत 10 रुपयांपेक्षा जास्त घेता येणार नाही. दुकानदारांनी याचं उल्लघन केल्यास त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, असाही इशाका सरकारकडून देण्यात आला आहे.
Coronavirus | हँड सॅनिटायझर अन् मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : राजेंद्र शिंगणे
हँड सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार
राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मास्क आणि हँड सॅनिटायझरचा वापर करण्यासाठी सांगितले जात आहे. परिणामी लोक मोठ्या प्रमाणात हँड सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला आहे. तर, या परिस्थितीचा गैरफायदा घेत अनेकांनी कमी दर्जाचे हँड सॅनिटायझर आणि मास्क बाजारात आणले जात आहे. दरम्यान, याची गंभीर दखल सरकारने घेतल्याचे राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले आहे.
Coronavirus | आपण सुधारणार कधी?
महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 63
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. कोरोना व्हायरसच्या कचाट्यात देशातील 20 राज्य अडकली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. राज्यात एका दिवसात 11 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 52 होता, जो आज वाढून 63 वर पोहोचला आहे. नवीन 11 रुग्णांपैकी 10 रुग्ण मुंबईतील आहेत, तर एक रुग्ण पुण्यातील आहे.
Quarantine Patients Navi Mumbai | होमक्वॉरन्टाईन रुग्ण घराबाहेर, तिघांना घेऊन आयुक्त पनवेल रुग्णालयात