नवी दिल्ली : भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे सांगत इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरला पुन्हा एकदा नोटिस पाठवले आहे.  ट्विटरने नकाशात लेहला जम्मू काश्मीरचा भाग दाखवला होता.  नोटीसला उत्तर देण्यासाठी ट्विटरला पाच दिवसाचा वेळ देण्यात आला आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चुकीचा नकाशा दाखवून भारताच्या सार्वभौमत्वाचा आणि अखंडतेचा अनादर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई का केली जाऊ नये? अशी विचारणा करत पाच दिवसात इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ट्विटरकडून स्पष्टीकरण मागितले आहे.





ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 31 ऑक्टोबरपासून जम्मू काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहे. लेह हा लडाखचा भाग असून ट्विटरने नकाशात जम्मू काश्मीरचा भाग दाखवला आहे. लेह लडाखमध्ये का दाखवण्यात आला नाही अशी विचारणा देखील केंद्र सरकारने केली आहे. लडाख हा चीनचा भाग आहे असे काही दिवसांपूर्वी ट्विटरने त्यांच्या नकाशात दाखवले होते.


संबंधित बातम्या :



संयुक्त संसदीय समितीचा लडाख मुद्द्यावरुन ट्विटरवर प्रश्नांचा भडिमार, स्पष्टीकरण अपुरे असल्याचा ठपका