एक्स्प्लोर

देशभरात कोरोना लसीच्या 'ड्राय रन'पूर्वी आरोग्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक, कसा आहे प्लॅन?

देशभरातील सर्व राज्य व केंद्र शासित प्रदेशांमध्ये कोरोना लसीची ड्राय रन घेण्यात येणार आहे. यात काही राज्यांत अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुर्गम भागात आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्व राज्यांमध्ये उद्या (2 जानेवारी) ठराविक ठिकाणी कोरोना लसीची ड्राय रन घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज दिल्लीत होणाऱ्या ड्राय रनच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. बैठकीनंतर आरोग्यमंत्री म्हणाले, "लसी संदर्भात देशात गांभीर्याने प्रयत्न होत असून किमान दोन लसींनी औषध नियंत्रकांना मंजुरीसाठी अर्ज केला आहे."

डॉ. हर्ष वर्धन म्हणाले की, 'आम्ही पहिल्या टप्प्यात लसीच्या ड्राय रनसाठी पूर्णपणे तयार आहोत. निवडणुकीदरम्यान बूथ स्तरापर्यंत तयारी केली जाते तसेच लसीकरणासाठीही अशीच तयारी केली जाते. पहिल्या टप्प्यात ही लस देण्यात यावी यासाठी लोकांची यादीही तयार केली गेली आहे. प्रथम, लस आरोग्य कर्मचारी आणि अग्रभागी काम करणाऱ्यांना दिली जाणार आहे.

सर्व राज्यात कोरोना लसीची ड्राय रन होणार देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे 2 जानेवारीला ड्राई रन घेणार आहेत. हे ड्राय रन सर्व राज्यांतील राजधानीमध्ये तीन सत्रामध्ये घेण्याचा प्रस्ताव आहे. काही राज्यांत अशा जिल्ह्यांचा समावेश आहे जे दुर्गम भागात आहेत.

ड्राय रन ही प्रत्यक्षात लसीकरण करताना ज्याप्रमाणे नियोजन असते. तशाच प्रकारे होणार आहे. मात्र, या ड्राय रनमध्ये लस दिली जाणार नाही, फक्त लोकांचा डेटा घेतला जाईल, त्याला Co Win अ‍ॅपवर अपलोड केला जाईल. मायक्रो प्लॅनिंग, सेशन साइट मॅनेजमेन्ट आणि ऑनलाइन डेटा सुरक्षित करणे यासारख्या बर्‍याच गोष्टींची चाचणी केली जाईल. याव्यतिरिक्त, लसीकरण AEFI म्हणजेच लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांनंतर होणाऱ्या कोणत्याही संभाव्य प्रतिकूल घटनांच्या व्यवस्थापनावर ड्राय रनचा महत्त्वपूर्ण फोकस असेल.

चार राज्यात ड्राय रन यशस्वी याआधी आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या चार राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाची ड्राय रन यशस्वीरित्या झाली आहे. 28 आणि 29 डिसेंबरला या चार राज्यात ड्राय रन घेण्यात आली.

देशात कोरोना विषाणूची दहशत कायम आहे. आता कोरोना विषाणूच्या नव्या विषाणूनेही भारतात शिरकाव केला आहे. आतापर्यंत 25 हून अधिक लोकांना या नवीन विषाणूची लागण झाली आहे. ज्यांचे नमुने नवीन स्ट्रेन साठी पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वतंत्र खोल्यांमध्ये वेगळे केले गेले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP MajhaOne Nation One Election : एक देश एक निवडणूक समितीच्या शिफारसीTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग 
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Chhagan Bhujbal: मोठी बातमी: छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण राज्यपालपदी वर्णी लागणार? भाजप आमदाराचा दावा
छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळलं, पण मोठी जबाबदारी मिळणार? राज्यपालपदी वर्णी लागणार?
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात  9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी 
आयपीओची मालिका सुरुच, आठवड्यात 3500 कोटींचे 9 IPO येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी 
Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?
छगन भुजबळांसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का वगळलं?
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Embed widget