भारत : भारत (India) आणि चीनच्या (China) सीमेवर म्हणजेच एलएसी (LAC) भागामध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झाल्यानंतर आता सकारात्मक संकेत मिळत असल्याचं चित्र सध्या आहे. डेमचोक आणि डेपसांग मैदानावर प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर दोन्ही देशांकडून 'मॅरेथॉन चर्चा' करण्यात येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या पूर्व भागातील समस्या सोडवण्यासाठी दौलत बेग ओल्डी आणि चुशुल मेजर आणि जरनल स्तरावर शुक्रवार (18 ऑगस्ट) पासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे.
सीमा प्रश्नावर महत्त्वपूर्ण चर्चा
पूर्व लडाखमधील सीमा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांकडून आतापर्यंत बऱ्याचदा चर्चा करण्यात आली होती. कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेनंतर भारतीय लष्कर आणि चीन लष्करातील मेजर जनरल स्तरावर चर्चा करण्यात येणार आहे. भारत आणि चीनमधील सीमीप्रश्न हा अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. तसेच या भागामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे या भागातील सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देश आता प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे.
या मुद्द्यांवर देखील बैठकीमध्ये चर्चा
भारतीय लष्कराकडून दोन वेगवेगळ्या जागांवर त्रिशूळ डिवीजनकडून कमांडर मेजर जनरल पीके मिश्रा आणि युनिफॉर्म फोर्स कमांडर मेजर जनरल हरिहन यांच्याकडून भारताचे प्रतिनिधीत्व करण्यात येत आहे. या बैठकीची सुरुवात 13 आणि 14 ऑगस्ट रोजी चुशुल मोल्डो या सीमाभागातील पॉईंटपासून करण्यात आली आहे.
दोन्ही देशांकडून डेपसांग मैदानात पुन्हा गस्त सुरु करणे आणि CNN जंक्शनवरील चिनी लष्कर यांसारख्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येत आहे. तसेच सीमेवरील वारसा मुद्द्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात येत आहे. मागील तीन वर्षांपासून भारत आणि चीनच्या सीमेवरील स्थिती ही तणावपूर्वक होत चालली आहे. त्याच्या परिणाम इतर स्तरातील संबंधांवर देखील होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
50 हजारांपेक्षा अधिक सैन्य तैनात
भारत आणि चीनने एलएसी म्हणजेच भारत आणि चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून पूर्व लडाखमध्ये 50,000 हून अधिक सैन्य तैनात केले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत या मुद्द्यावर विस्तृत चर्चा देखील केली. त्यांनंतर चार महिन्यांनंतर कॉर्प्स कमांडरमधील चर्चेची ही 19 वी फेरी आहे.
दोन्ही देशांमध्ये सुरु असलेली ही चर्चा लडाखच्या सीमावर्ती भागातील प्रश्न सोडवणार का हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच या चर्चेमधून काही सकारात्मक तोडगा निघणार का याकडे दोन्ही देशांतील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे.