India On Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात झालेल्या भारतीय कैद्यांच्या मृत्यूवरुन भारताने चिंता व्यक्त केली आहे. शिक्षा पूर्ण झाल्यानंतरही पाकिस्तानच्या (Pakistan) तुरुंगात सहा भारतीय कैद्यांचा मृत्यू झाला. यावरुन भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या इतर कैद्यांना सोडण्याची मागणी केली आहे. 


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत भारताची बाजू मांडली. तसेच यावेळी त्यांनी पाकिस्तानवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, 'मागील नऊ महिन्यात पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या सहा भारतीय लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच जण मच्छीमार करणारे होते. चिंताजनक बाबल म्हणजे सहाही कैद्यांनी शिक्षा पूर्ण केली होती. त्यांना भारतात परत पाठण्याचं आम्ही आवाहन केले होते. पण त्यानंतरही पाकिस्तानने त्यांची सुटका केली नाही. पाकिस्तानने सहाही भारतीयांना बेकायदेशीरपणे तुरुंगातच ठेवलं. '
 
बागची म्हणाले की, '' पाकिस्तानच्या तुरुंगात असणाऱ्या भारतीय कैद्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं असून हे चिंताजनक आहे. तेथील भारतीय कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा इस्लामाबादमधील उच्च आयोगाने वारंवार उपस्थित केला होता. तुरुंगात असणाऱ्या भारतीय कैद्यांना भारतामध्ये पाठवावे, असे आवाहन भारताने पाकिस्तान सरकारला केलेय. "






बागची यांनी पत्रकार परिषदेत चीनसोबत सुरु असलेल्या सीमावादावरही भूमिका स्पष्ट केली. अद्याप काही कामही बाकी आहे. याशिवाय म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे बागची म्हणाले.  


चीन आणि म्यानमारवर काय म्हणाले?  
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले की, 'एलएसीवर डिसएंगेजमेंटसाठी जी काही पावले उचलवावी लागणार आहेत, त्या स्थितीपर्यंत अद्याप आपण पोहचू शकललो नाही. तेथील परिस्थितीही अद्याप सामन्या नाही. काही सकारात्मक पावले उचलली आहेत. पण अद्याप काही गोष्टी बाकी आहेत.' म्यानमारमध्ये अडकलेल्या 50 जणांना वाचवण्यात आलं आहे. काही जण तेथील पोलिसांच्या ताब्यात आहेत, कारण ते अवैध मार्गाने गेले होते. आम्ही त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्याशिवाय काही जण तेथे कैदी आहेत, त्यांनाही माघारी आणण्याचा प्रयत्न करत आहोत.  


 इतर महत्वाच्या बातम्या : 


Ajit Pawar In Kolhapur : कोल्हापूरमध्येही गद्दार निघालेत, त्यांना जागा दाखवायची आहे! अजित पवारांचा थेट इशारा 
'आईवडिलांना शिव्या द्या चालेल, पण मोदी-शाहांना शिव्या देणं सहन करणार नाही'; चंद्रकांत दादांचं वक्तव्य, रोहित पवार म्हणाले....