एक्स्प्लोर
Advertisement
काश्मीरसोबत बिहारही घ्या, काटजू पुन्हा बरळले
नवी दिल्ली : उरी हल्ल्यामुळे भारतात पाकिस्तानविरोधी वातावरण असताना माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे. फेसबुकवर पाकिस्तानला उद्देशून टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी काश्मीरसोबत बिहारही घ्यावा लागेल, असं म्हटलंय.
तसेच पाकिस्तानपेक्षा बिहार भारताला जास्त घातक असल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टनंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतो आहे.
मार्कंडेय काटजू नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात, मात्र हे वक्तव्य काटजूंना चांगलंच महागात पडताना दिसतं आहे. कारण जेडीयूने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केलीय.
दरम्यान, एबीपीशी बोलताना त्यांनी आपण विनोद म्हणून ही पोस्ट टाकल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
हिंगोली
शिक्षण
बॉलीवूड
पुणे
Advertisement