एक्स्प्लोर

मराठा शौर्य दिन : 'पानिपत'च्या युद्धभूमीवर 'जय भवानी, जय शिवाजी'चा गजर

पानिपतमधल्या ऐतिहासिक काला आम युद्धभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

पानिपत : 14 जानेवारी म्हणजे संक्रांत असं समीकरण असलं तरी महाराष्ट्राच्या इतिहासासाठी या दिवसाची आणखी एक ओळख आहे. 14 जानेवारी 1761 याच दिवशी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अहमद शहा अब्दालीसारख्या परकीयाचं आक्रमण रोखण्यासाठी मराठ्यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. पानिपतमधल्या ऐतिहासिक काला आम युद्धभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठा शौर्य दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या पूर्वजांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हरियाणामधले रोड मराठा आणि महाराष्ट्रातूनही आलेले शेकडो लोक जमा झाले होते. पानिपतच्या युद्धानंतर काही मराठा सैन्य हे त्याच ठिकाणी स्थायिक झालं. हरियाणामध्ये त्यांची ओळख रोड मराठा अशी आहे. मराठा जागृती मंच हरियाणातर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पानिपतच्या युद्धासाठी कुरूक्षेत्रावरुन ज्या मार्गाने मराठा फौजा आलेल्या होत्या, त्या मार्गावर कुरुक्षेत्र ते पानिपत अशी बाईक रॅली काढत हरियाणातले शेकडो रोड मराठा युवक या युद्धस्थळावर जमा झाले होते. शहीद स्मारकाशेजारी पणती लावून आपल्या पूर्वजांना नमन करण्यासाठी शेकडो महिलाही या ठिकाणी उपस्थित होत्या. जय शिवाजी, जय भवानीचा गजर करत आणि शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा हरियाणवीमधून सादर करत हरियाणामधल्या या रोड मराठा समाजाने आपण स्थायिक जरी दूरवर असलो तरी नाळ मात्र मराठी अस्मितेशी जोडली असल्याचं दाखवून दिलं. या कार्यक्रमासाठी नागपूरच्या भोसल्यांचे वंशज मुधोजीराजे भोसले, जिजाऊंच्या घराण्याचे वंशज बाबाराजे जाधव, इतिहासकार वसंतराव मोरे हेही आवर्जून उपस्थित होते. पानिपतला 250 वर्षे पूर्ण झाली त्यावेळी हरियाणामधले मराठी अधिकारी अजित जोशी यांच्या पुढाकाराने या शौर्य दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
JDU BJP Merger Controversy : नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget