एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठा मोर्चाची आता राजधानीत धडक, उद्या दिल्लीत बैठक
नवी दिल्ली: राज्यभरात मूक मोर्चाद्वारे राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतल्यानंतर, आता मराठा क्रांती मूक मोर्चा दिल्लीत धडकणार आहे.
मराठा मोर्चाला आता राजधानी दिल्लीचे वेध लागले आहेत. दिल्लीतले मराठा आता मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनात उद्या नियोजनासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मोर्चाचं ठिकाण, मोर्चाची तारीख यावर चर्चा होणार आहे.
दिल्ली आणि परिसरातील किमान १० हजार लोक जमवण्याची तयारी आयोजकांनी केली आहे.
कोपर्डी बलात्कारातील आरोपींना 6 महिन्यांच्या आत फाशी द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या प्रमुख मागण्या, मूक मोर्चाद्वारे मराठा समाजाने केला आहे.
निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात
ज्या एका घटनेमुळे मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी पडली, त्याच घटनेचा काळिमा लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी मराठा समाजानं क्रांती मोर्चाद्वारे भगवं वादळ उठवलं. विशेष म्हणजे कोपर्डीतील पीडित मुलीच्या वडिलांनीही या मोर्चात सहभाग घेतला. नगरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील सहभागी झाले होते.
मराठा मोर्चे कुठे कुठे निघाले?
औरंगाबाद (9 ऑगस्ट), उस्मानाबाद (25 ऑगस्ट), जळगाव (29 ऑगस्ट), बीड (30 ऑगस्ट), परभणी (3 सप्टेंबर), हिंगोली (17 सप्टेंबर), नांदेड (18 सप्टेंबर), जालना (19 सप्टेंबर), अकोला (19 सप्टेंबर), लातूर(19 सप्टेंबर), नवी मुंबई (21 सप्टेंबर) , सोलापूर (21 सप्टेंबर), अहमदनगर (23 सप्टेंबर), नाशिक (24 सप्टेंबर).
मराठा मोर्चे कुठे निघणार?
पुणे (25 सप्टेंबर), वाशिम (25 सप्टेंबर), बुलडाणा (26 सप्टेंबर), नंदुरबार (26 सप्टेंबर), सांगली (27 सप्टेंबर), धुळे (28 सप्टेंबर), बारामती (29 सप्टेंबर), सातारा (3 ऑक्टोबर) इथे मराठा समाजाचा मोर्चा होणार आहे.
संबंधित बातम्या
उदयनराजे भोसले मराठा मोर्चात, नाशिकमध्ये एल्गार
नाशिकमध्ये आज मराठा समाजाचा विराट मोर्चा
अहमदनगर मराठा क्रांती मूक मोर्चा स्पेशल अपडेट
निर्भयाच्या नगरमध्ये मराठा मोर्चा, निर्भयाचे वडीलही मोर्चात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement