Manipur Crisis : मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला, भाजपच्या मित्रपक्षानं सरकारचा पाठिंबा काढला, जाणून घ्या पक्षीय बलाबल
Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचारानंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. दुसरीकडे भाजप सरकारचा पाठिंबा एनपीपी पक्षानं काढला आरहे.
NPP Pulls Out Support In Manipur इम्फाळ: नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) नं मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या नेतृत्त्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिलेला पाठिंबा मागं घेण्याचा निर्णय घेतला हे. मणिपूरमध्ये सुरु असलेल्या संकटावर मार्ग काढण्यात भाजप सरकार अपयशी ठरल्याचं एनपीपीनं म्हटलं आहे. एनपीपीनं भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना म्हटलं आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांनी भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात मणिपूरमधील कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली आहे. स्थिती आणख खराब झाली आहे, त्यामुळं निर्दोष लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील लोकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं संगमा यांनी म्हटलंय.
एनपीपीनं काय म्हटलं?
नॅशनल पीपल्स पार्टीचे अध्यक्ष कॉनराड के. संगमा यांनी जे.पी. नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की बिरेन सिंह यांच्या नेतृत्त्वातील मणिपूर राज्य सरकार संकटावर मार्ग काढण्यात आणि सामान्य स्थिती निर्माण करण्यात अपयशी ठरलं.सद्यस्थिती लक्षात घेत नॅशनल पीपल्स पार्टीनं मणिपूरमधील बिरेन सिंह यांच्या नेतृत्त्वातील सरकाला दिलेला पाठिंबा तात्काळ प्रभावानं मागं घेण्याचा निर्णय घेतलाय, असं पत्रात म्हटलंय.
एनपीपीकडे किती आमदार?
एनपीपीकडे मणिपूरमर विधानसभेत 7 आमदार आहेत. यामध्ये शेख नूरुल हसन (क्षेत्रीगाओ), खुराइजम लोकेन सिंह (वांगोई ), इरेंगबाम नलिनी देवी (ओइनम ), थोंगम शांति सिंह (मोइरंग ), मयंगलमबम रामेश्वर सिंह (काकचिंग), एन. कायिसि (तादुबी) आणि जंघेमलंग पनमेई (तामेंगलोंग ) यांचा समावेश आहे.
मणिपूर विधानसभेतील पक्षीय बलाबल
मणिपूर विधानसभा निवडणूक 2022 मध्ये पार पडली होती. भाजपनं त्यावेळी 32 जागा जिंकत बहुमत मिळवलं होतं.एनपीपीने 7 जागा मिळल्या होत्या. तर काँग्रेसनं 5जागा मिळवल्या होत्या. इतरांनी 16 जागा मिळवल्या होत्या.एन. बिरेन यांच्या सरकारला मात्र स्पष्ट बहुमत असल्यानं कोणताही धोका नाही.
The National People's Party today decided to withdraw its support from the Manipur coalition government.
— National People’s Party (NPP) (@nppmeghalaya) November 17, 2024
NPP National President and HCM Shri. @SangmaConrad in a letter to the President of BJP Shri. @JPNadda ji informed that by witnessing the deterioration of law pic.twitter.com/FGo3RCxdkz
इतर बातम्या :