एक्स्प्लोर

मणिशंकर अय्यर पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर ठाम

2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना 'नीच' संबोधलं होतं, या वक्तव्यावर आपण आजही ठाम असल्याचं अय्यर यांनी स्पष्ट केलं

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही दिवसांवर असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. मोदी 'नीच' असल्याचा उल्लेख अय्यर यांनी केला होता. मणिशंकर अय्यर यांनी 'रायझिंग काश्मिर' या वृत्तपत्रात याबाबत लेख लिहिला आहे. 2017 मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदींना 'नीच' असं संबोधलं होतं. अय्यर यांच्या वक्तव्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीतही बसला होता. त्यानंतर काँग्रेसने अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आजही आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं अय्यर यांनी सांगितलं.
मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मणिशंकर अय्यरांची काँग्रेसमध्ये वापसी
'पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगांचा आसरा घेण्याचा भारतीय वायुसेनेला सल्ला दिला होता' हे मोदींनी केलेलं वक्तव्य आश्चर्यकारकरित्या मूर्खपणाचं होतं, असं अय्यर म्हणाले. 'अशाप्रकारे अवैज्ञानिक दावे करताना मोदी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का? आणि निर्ढावलेल्या पंतप्रधानांची चूकही सुधारता न येण्याइतके हे अधिकारी भित्रे आहेत का?' असा प्रश्न अय्यर यांनी उपस्थित केला आहे. VIDEO | मोदी 'नीच' असल्याच्या 2017 साली केलेल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर अजूनही ठाम | एबीपी माझा डिसेंबर 2017 मध्ये मणिशंकर अय्यर नेमकं काय म्हणाले होते? "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी एका व्यक्तीचं मोठं योगदान होतं, त्यांचं नाव म्हणजे जवाहरलाल नेहरु आणि अशा कुटुंबाबद्दल घाणेरडे वक्तव्य केली जातात, तेही डॉ. आंबेडकरांच्या नावाने मोठ्या वास्तूच्या उद्घटनावेळीच. मला वाटतं ही (नरेंद्र मोदी) व्यक्ती अत्यंत नीच प्रकारची आहे. तिच्यात कोणतीही सभ्यता नाही. अशा चांगल्या प्रसंगी घाणेरड्या राजकारणाची काय गरज आहे?", असे मणिशंकर अय्यर म्हणाले होते. अय्यर यांच्या 'त्या' वक्तव्यावेळी मोदींचं प्रत्युत्तर सुरतमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली होती. अय्यर यांनी आपल्याला उद्देशून वापरलेले शब्द म्हणजे गुजरातचा अपमान असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. "उच्च-नीच हे देशाचे संस्कार नाहीत. माझ्यासारख्याने चांगले कपडे परिधान केल्याचे मुघल संस्कार असणाऱ्यांना बघवत नाहीत. मी भलेही खालच्या जातीतला असेन, मात्र काम उच्च आहेत.", असं मोदी म्हणाले होते. राहुल गांधींनी केला होता निषेध भाजप आणि पंतप्रधान मोदी कायमच काँग्रेसविरोधात घाणेरडी भाषा वापरत असतात. मात्र, काँग्रेसचे संस्कार आणि वारसा वेगळा आहे. त्यामुळे मणिशंकर अय्यर यांनी मोदींना उद्देशून वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करणार नाही. किंबहुना, काँग्रेस पक्ष आणि मी अशी अपेक्षा करतो की, त्यांनी मोदींबाबत वापरलेल्या शब्दाबद्दल माफी मागावी.", असं म्हणत राहुल गांधींनी मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला होता. मणिशंकर अय्यर यांची तेव्हाची दिलगिरी सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली होती. "मी इंग्रजीतील 'Low' शब्दाचा अनुवाद 'नीच' असा केला होता. हिंदी ही माझी मातृभाषा नाही. तरीही चुकीचा अर्थ निघाला असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो.", असं म्हणत मणिशंकर अय्यर यांनी खेद व्यक्त केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

Embed widget