Manali : मनालीत पर्यटकांची गर्दीच गर्दी; मास्क न घातल्यास 5000 रुपयांचा दंड किंवा 8 दिवसांचा तुरुंगवास
लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर पर्यटकांनी शिमला आणि मनालीमध्ये मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे.
![Manali : मनालीत पर्यटकांची गर्दीच गर्दी; मास्क न घातल्यास 5000 रुपयांचा दंड किंवा 8 दिवसांचा तुरुंगवास Manali is crowded with tourists without mask a fine of Rs 5000 or imprisonment for 8 days Manali : मनालीत पर्यटकांची गर्दीच गर्दी; मास्क न घातल्यास 5000 रुपयांचा दंड किंवा 8 दिवसांचा तुरुंगवास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/07/09/dd70870efefacd3f3e2855128e8bb326_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मनाली : एक वेळ अशी होती की भारतातील रुग्णालयात बेड्स मिळत नव्हते. आता निर्बंध थोडे शिथिल केल्यानंतर मनाली मध्ये पर्यटकांची गर्दी एवढी वाढली आहे की त्या ठिकाणी हॉटेल्समध्ये रुम मिळेनात. मनालीत मोठ्या संख्येने पर्यटक पोहचत असून त्यामुळे कोरोनाच्या नियमांचा फज्जा उडाल्याचं दिसून आलं आहे. आता त्यावर प्रशासनाने कडक पावलं उचलायला सुरुवात केली असून पर्यटकांनी मास्क न लावल्यास 5000 रुपयांचा दंड किंवा आठ दिवसांचा तुरुंगवास अशी शिक्षा मिळणार आहे.
कोरोनाच्या निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलती मिळाल्यानंतर पर्यटकांनी हिमाचल प्रदेशमधील मनाली आणि शिमल्यामध्ये मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. त्या संबंधी सोशल मीडियामध्ये वेगवेगळे फोटो शेअर करण्यात येत होते. मनालीमध्ये सोशल डिस्ट्न्सिंगचा फज्जा उडाल्याचं दिसून येत होतं. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही हिमाचल प्रदेश सरकारला एक पत्र लिहिलं आणि कोरोनाच्या नियमांचा भंग करणाऱ्या पर्यटकांविरोधात कडक पावलं उचलण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे हिमाचल प्रदेश सरकारने आता मास्कचा वापर ने केल्यास 5000 रुपयांचा दंड किंवा आठ दिवसांचा तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झाला नाही. तरीही पर्यटकांनी आता हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून येत आहे. ही गोष्ट चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता
गर्दीच्या ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या पर्यटकांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीनी चिंता व्यक्त केली असून पर्यटकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)