एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार

लोकसभा निवडणुक निकालानंतर 30 मे ला पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडणार आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुक निकालानंतर 30 मे ला पंतप्रधान मोदींचा शपथविधी पार पडणार आहे. "मी इतर मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा केली आहे. ते देखील या शपथविधीला जाणार आहेत. हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने मी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे", असे ममता यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. शेवटच्या टप्प्यातील मतदानाआधी पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटनाही झाल्या. त्यावरुन भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर 'फनी वादळ' धडकलं त्यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत विचारणा करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या फोनला ममतांनी प्रतिसाद दिला नव्हता. या सगळ्या घटनांनंतर ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधीला जाणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती. नरेंद्र मोदी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मंत्र्यांचा शपथविधी देखील पार पडणार आहे. या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार याबाबत अनेक अंदाज लावले जात असताना ममता यांनी मात्र त्या उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ममता बॅनर्जींना झटका, दोन आमदारांसह 60 नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Ramlila Maidan Protest Charges : सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे
सरकारकडून आंदोलकांची आर्थिक कोंडी, रामलिला मैदानाच्या एका दिवसाच्या बुकिंगसाठी 'इतके' लाख रुपये खर्च, फक्त 3 दिवसच मैदान मोकळे

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar Crime: देवीच्या दर्शनाला गेल्या, रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
देवीच्या दर्शनानंतर रात्री गरबा खेळून घरी परतल्या, झोपेत असताना 'कुंभकर्णा'ने पत्नीला संपवलं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On MPSC Protest Pune: MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
MPSC च्या चौकशी समितीची जबाबदारी मिळताच तुकाराम मुंढेंनी पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
India Alliance Petition Against ECI: नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
नावं चुकली, सह्या राहिल्या...निवडणूक आयोगाविरोधातील इंडिया आघाडीच्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने काढल्या 14 त्रुटी
Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
Rohit Pawar and Sushma Andhare: सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
सुषमा अंधारेंचं 'ते' वाक्य झोंबलं, रोहित पवारांनी प्रचंड सुनावलं, म्हणाले, 'तुम्ही आक्रमक बोलून निघून गेलात....'
Embed widget