एक्स्प्लोर

गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला दणका, 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये फूट

पाटीदार आंदोलनाच्या 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये रोज फूट पडत आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला आणखी एक मोठा दणका मिळाला असून, हार्दिकसोबत उभ्या असणाऱ्या संघटनांनी आपली वेगळी चूल मांडली आहे.

नवी दिल्ली : ज्या पाटीदार आंदोलनामुळे हार्दिक पटेलला गुजरातमध्ये नवी ओळख मिळाली. त्याच पाटीदार आंदोलनाच्या 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मध्ये रोज फूट पडत आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेलला आणखी एक मोठा दणका मिळाला असून, हार्दिकसोबत उभ्या असणाऱ्या संघटनांनी आपली वेगळी चूल मांडली आहे. 'पाटीदार ऑर्गनायझेशन'मधील 6 प्रमुख संघटनांनी हार्दिकपासून फारकत घेऊन आपली वेगळी चूल मांडली. आज या संघटनांनी अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन हार्दिक पटेलवर टीकेची झोड उठवली. हार्दिक पटेल आरक्षणाच्या मुळ मुद्द्यावरुन भटकला असून, तो प्रत्येक ठिकाणी स्वत: चा वैयक्तिक स्वार्थ पाहात असल्याची टीका पाटीदार आंदोलनातील नेत्यांनी केली. तसेच हार्दिक पटेल आरक्षणाच्या नावावर आपली राजकीय पोळी भाजून घेतल असल्याचा आरोपही पाटीदार नेत्यांनी केला. 'पाटीदार ऑर्गनयझेशन'मधून बाहेर पडणाऱ्यांमध्ये उमिया माताजी संस्था (उंझा), खोडलधाम (कागवद,राजकोट), विश्व उमिया फाऊंडेशन (अहमदाबाद), समस्त पाटीदार समाज (सुरत), उमिया माताजी मंदिर (सिदसर), सरदारधाम (अहमदाबाद) या संघटनांचा समावेश आहे. या संघटनांनी हार्दिक पटेलवर टीकेची झोड उठवत, आंदोलनकर्त्यांची दिशाभूल केल्याचा आरोप केला. तसेच प्रत्येक गावात सभा घेऊन समाजातील नागरिकांना जागृत केलं जाईल, असं सांगितलं. पाटीदार ऑर्गनायझेशनमध्ये फूट पडल्याने हार्दिक पटेल सोबतच राहुल गांधींसाठी मोठा दणका असल्याचं बोललं जात आहे. कारण, गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून पाटीदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. पण त्यातच पाटीदार आंदोलनातच उभी फूट पडली आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, हार्दिक सोबत जे पाटीदार होते, त्यांची संख्या दिवसेंदिवस रोढावत आहे. पाटीदार समाजातील जुन्या पीढीचे लोक आजही भाजपला समर्थन देतात. त्यातच नव्या पिढीचे तरुणही आता भाजपच्या बाजूने जात आहेत. राज्यात सत्ता स्थापनेसाठी पाटीदार समाजाचा पाठिंबा अतिशय महत्त्वाचा आहे. कारण गुजरातमध्ये पाटीदार समजाची लोकसंख्या एकूण 15 टक्के आहे. या 15 टक्क्यांपैकी 60 टक्के लेवा पटेल, 40 टक्के कडवा (पटेल) समाज आहे. त्यातील भाजपचे 182 पैकी 44 आमदार पाटीदार समाजाचे आहेत. दरम्यान, पाटीदार आरक्षण संघर्ष समितीचे राष्ट्रीय संयोजक अश्विन पटेल यांनीदेखील काँग्रेसकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचं यापूर्वीच म्हटलं होतं. कारण, प्रदीर्घ काळापासून त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद दिला गेला नाही. त्यामुळे भाजपसोबत चर्चा करुन मागण्यांवर तोडगा काढला जाईल, असे संकेत दिले होते. हार्दिक पटेलही काँग्रेसला समर्थन देण्याच्या बाजूने आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक पाटीदार समाजातील नेते हार्दिक विरोधात उभे ठाकत आहेत. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वामीनारायण आणि अक्षरधाम मंदिराचा दौरा पाटीदार समाजाला अजून भाजपच्या जवळ आणण्यास सहाय्यभूत होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget