Mahashivratri 2024 LIVE Updates : सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी सपत्नीक कुणकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले
Mahashivratri 2024 LIVE Updates : आज महाशिवरात्री! राज्यासह देशभरात महादेवाच्या नावाचा जयघोष सुरू आहे. या निमित्त दिवसभरातील ताज्या घडामोडी, अपडेट्स जाणून घ्या
Sindhudurg : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सपत्नीक कुणकेश्वर मंदिरात भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले. दरवर्षी नारायण राणे कुणकेश्वर मंदिरात सहकुटुंब दर्शनासाठी येत असतात. दर्शन घेतल्यानंतर कुणकेश्वर चरणी महाराष्ट्र सुजलाम होउदे, देशातील जनता सुखी समाधानी राहूदे आणि येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे 400 पार खासदार निवडून येउदेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होऊदेत असे साकडे कुणकेश्वर चरणी साकडं घातल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत नीलम राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार उपस्थित होते.
Shirdi : महाशिवरात्रीनिमित्त साईबाबांच्या शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी याचा महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. माध्यान्ह आरती नंतर साईबाबांना खिचडीचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवण्यात येणार असून आज महाशिवरात्रीनिमित्त शिर्डीच्या साईप्रसादालयात तब्बल साडेपाच हजार किलो साबुदाणा वापरून साबुदाणा खिचडी तयार करण्यात आलीय.. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र या दोन दिवशी साईप्रसादालयात साबुदाणा खिचडीचा प्रसाद देण्यात येत असतो.. आज खिचडी सोबतच शेंगदाणा आमटी सुद्धा भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात येतय... महाशिवरात्र निमित्त येणाऱ्या साई भक्तांना असणारा उपवास लक्षात घेता साई संस्थान कडून ही जय्यत तयारी करण्यात आली असून आज दिवसभरात जवळपास 50 ते 60 हजार भाविक साईप्रसादाला येतील अशी शक्यता गृहीत धरून साई प्रसादालयात हा साडेपाच हजार किलोचा साबुदाणा वापरून खिचडी तयार करण्यात आली आहे..
Nagpur : भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या आंभोरा येथील वैनगंगा नदीसह पाच नद्यांच्या संगमावरील अंभोरा येथील टेकडीवर प्रभू शिवाचं मंदिर आहे. चैतन्येश्वराच्या चैतन्यमयी वातावरणात आंभोरा येथील शिवमंदिरातील महाशिवरात्रीनिमित्त शंकर महादेवाचं दर्शन घेऊन दूरवरचा नयनरम्य परिसर न्याहाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची इथं गर्दी बघायला मिळतं आहे
Nanded : महाशिवरात्री निमित्ताने आज नांदेड मधील प्राचीन मंदिर असलेल्या काळेश्वर येथे भक्तांची अलोट गर्दी पहिला मिळत आहे, तसेच मंदिर परिसरात भाविकांना साठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे, खबरदारी म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त मंदिर परिसरात लावले आहे
Parbhani : महाशिवरात्री निमित्त जगातील सर्वात मोठ्या पाऱ्याचे शिवलिंग असलेल्या परभणीतील पारदेश्वर महादेव मंदिरात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे.मंदिरातुन आज सकाळीच रथातुन पारदेश्वर महादेवाची शोभायात्रा काढण्यात आली.मंदिर आणि परिसरातुन हि शोभायात्रा काढण्यात आली या शोभा यात्रेत टाळ,मृदूंग,कलश घेऊन मोठया प्रमाणावर महिला,तरुण,तरुणींसह मोठ्या संख्येने भक्त सहभागी झाले होते.महत्वाचे म्हणजे आज दिवसभर पारदेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली असुन देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात तसेच आज रात्री 12 वाजता पाऱ्याने महादेवाचा अभिषेक हि केला जातो.
Gondia : आज महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रवादी नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहरातील नागराधाम येथील स्वयंभू पंचमुखी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
यावेळी प्रफुल पटेल यांनी शिवलिंगाची पूजा अर्चना केली.
यावेळी देशातील सर्व नागरिकांना महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना केली.
त्यानंतर त्यांना भंडारा-गोंदिया लोकसभेवर विचारलं असता प्रफुल पटेल यांच्या मनात असलेली खदखद पुन्हा एकदा समोर आली.
"प्रफुल पटेल हे निवडणूक लढायला पाहिजे अशी नागरिकांची इच्छा आहे,
पण आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना चर्चा झाल्याशिवाय आपल्या उमेदवारीबद्दल बोलू शकत नाही"
असे म्हणत "उद्या संधी मिळाली तर नक्कीच लढेल असेही प्रफुल्ल पटेल म्हणायला विसरले नाही..
त्यामुळे राज्यसेवेवर गेल्यानंतर देखील प्रफुल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभेच्या मोह सुटला नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Nagpur : नागपूरातील नंदनवन परिसरात उंच शंकराच्या मूर्ती समोर शेकडो लोकांनी लघु रुद्र पुजन केले.. विशेष म्हणजे या पूजनात विविध जाती समुदायाचे 75 दाम्पत्य सहभागी झाले होते... त्यामुळे महा शिवरात्रीच्या निमित्ताने धार्मिक आयोजनातही एक वेगळं सामाजिक ऐक्य दर्शवण्यात आलं... यावेळी महिला दिनानिमित्ताने उपस्थित महिला पुजकांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला
Nagpur : नागपूरातील नंदनवन परिसरात उंच शंकराच्या मूर्ती समोर शेकडो लोकांनी लघु रुद्र पुजन केले.. विशेष म्हणजे या पूजनात विविध जाती समुदायाचे 75 दाम्पत्य सहभागी झाले होते... त्यामुळे महा शिवरात्रीच्या निमित्ताने धार्मिक आयोजनातही एक वेगळं सामाजिक ऐक्य दर्शवण्यात आलं... यावेळी महिला दिनानिमित्ताने उपस्थित महिला पुजकांचा विशेष सन्मान देखील करण्यात आला
Pune : पुण्यात सुप्रिया सुळे धारेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आल्या आहेत
पुण्यातील धायरी परिसरात सुप्रिया सुळे दाखल
Mahashivratri 2024 : ठाण्याच्या ग्रामदैवत श्री.कोपिनेश्वर मंदिरात महाराष्ट्रातील सर्वात मोठे शिवलिंग असणारे सुमारे एक हजार वर्ष जुन्या ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी . कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठीच पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
Mahashivratri 2024 : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग देवगड येथील कुणकेश्वर मंदिराच्या जत्रोत्सवाला आज पासून सुरवात झाली आहे. या वर्षीचा शासकीय पूजेचा मान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आला होता. शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शन रांगा खुल्या केल्या. कुणकेश्वर जत्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात करण्यात येणारी आकर्षक विद्युत रोषणाई नेहमीच लक्षवेधी ठरत असते. आंगणेवाडी प्रमाणे या जत्रोत्सवात देखील राजकीय नेते मंडळींची मांदियाळी पाहायला मिळते. दरवर्षी सात ते आठ लाख भाविक कुणकेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेतात. कुणकेश्वर हे जागृत देवस्थान असून या ठिकाणी कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावर 107 शिवलिंग आहेत, ओहोटीच्या वेळी ही शिवलिंग दृष्टीस पडतात. काशी प्रमाणे कुणकेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे.
Mahashivratri 2024 : भंडारा येथील प्रसिद्ध रांगोळी चित्रकार चित्रा वैद्य यांनी महाशिवरात्रीनिमित्त रांगोळीतून शंकर महादेवाचं चित्र काढलं. सुमारे दहा तासांच्या अथक प्रयत्नांतून हे चित्र काढलं आहे. यापूर्वीही त्यांनी विविध प्रकारचे चित्र काढले असून त्यांचं नावं इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालं आहे.
Mahashivratri 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील 350 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या पळशी झाशी येथील श्री शंकर गिरी महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे..महाशिरात्रीनिमित्त याठिकाणी प्रसाद म्हणून एक साडे नऊ क्विंटल चा महारोठ तयार करण्यात येतो..आज महाशिवरात्रीनिमित्त याठिकाणी महारोठ तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.... आज दिवसभर हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत...अगदी सकाळपासून भाविकांची रांग लागली आहे....
Mahashivratri 2024 : शिवरात्रीच्या पावन पर्वावर लातूरच्या ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी … सिद्धेश्वर महाराज की जय घोषणांनी मंदिर गजबजले. आज रात्री बाराच्या नतर मंदिरात गवळी समाजाच्या मान नुसार लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर मंदिरात वाजत गाजत दुध दही तूप साखर आणि मधाने विधिवत पूजा सुरू होते..सर्वत्र हर हर महादेव आणि सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर महाराज कि जय या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते..
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील सर्व शिवमंदिर गजबजले आहेत त्याच पद्धतीने आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर सुद्धा भक्तांनी गजबजले आहे औंढा नागनाथ मंदिरामध्ये मध्यरात्रीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांची गर्दी पाहायला मिळाली आहे मध्यरात्री एक वाजता च्या सुमारास कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक महापूजा केली त्या नंतर रात्री 2 वाजता मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करण्यात आले या महाशिवरात्रीच्या दिवशी नागनाथ मंदिरामध्ये फुलांचे हार आणि आंब्यांच्या साहाय्याने सजावट करण्यात आली आहे या सजावटीमुळे मंदिराच्या गाभाऱ्यातील सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते
Mahashivratri 2024 : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाला आंब्यांची आरास करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिरामध्ये भूगर्भात असलेल्या शिवलिंगाची सजावट करण्यात आली आहे शिवलिंगाला फुलांची सजावट करत यावर्षीच्या नवीन आंब्यांची आरास सुद्धा करण्यात आली आहे त्यामुळे शिवलिंगाचे सौंदर्य अधिक वाढले आहे
Mahashivratri 2024 : उभ्या महाराष्ट्राच कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या गडावर म्हणजेच जेजुरी येथे महाशिवरात्री साजरी करण्यात येत आहे. मंदिरात असणारी तीन गुप्तलिंग वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्री ला दर्शनासाठी खुले केले जातात. सकाळपासून गुप्तलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलीये. खंडेरायाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आणि शिखरामध्ये गुप्तलिंग आहे.. गुप्तलिंग वर्षात फक्त एकच दिवस उघडले जाते.. भुलोक, पाताळलोक, स्वर्गलोक अशा तिनही लोकांची एकाच दिवशी महाशिवरात्रीला दर्शन होत असल्याची श्रद्धा भाविकांची आहे.. महाशिवरात्रीला गडावर लाखो भाविक गुप्तलिंगाच्या आणि खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात.. मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Mahashivratri 2024 : आज महाशिवरात्री असल्याने राज्यभरातील शिव मंदिरामध्ये मोठे गर्दी होताना पाहायला मिळतेय. बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवी ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात सुद्धा मोठी गर्दी होत आहे.. दोन दिवस वैजनाथ मंदिर हे 24 तास चालू असल्याने रात्रीपासूनच लोक दर्शनासाठी रांगेत लागले होते
Mahashivratri 2024 : महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला विद्युत रोषणाई
-पहाटे विधीवत पूजा करून मंदिर भाविकांसाठी करण्यात आले खुलं
- भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी
- आलेल्या सर्व भाविकांना दर्शन मिळावे यासाठी आज रात्री 9 पर्यंत मंदिर राहणार सुरू
- 24 तास मंदिर सुरू राहणार असल्याने सर्व भाविकांना मिळणार दर्शन
- तीन दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार
- सर्वसामान्य भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी vip दर्शन बंद
- दर्शन रांगेत भाविकांना पिण्याचे पाणीसह सर्व सुविधा उपलब्ध
- महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन
Mahashivratri 2024 : आज महाशिवरात्री निमित्ताने भीमा शंकर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग या महादेवाच्या मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. मंदिराला खूप सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. पहाटेपासून भाविकांसाठी मंदिर कुल करण्यात आला आहे. अनेक भाविक अभिषेक देखील करत आहेत. वेगवेगळ्या राज्यातून लांबून लांबून भाविक या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आले आहेत
Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केलीय..
घृष्णेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला आहे त्यामुळं या मंदिराला पूर्ण प्रदक्षणा घातली जाते....
महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक दाखल झालेत..
मध्यरात्रीपासून भाविकांनी गर्दी केलीय...
मराठवाड्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून इथं भाविक दाखल झालेत.
याठिकाणी हेमाडपंथी शिवमंदिर असून या मंदिराचा अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोध्दार केलेला आहे..
गर्दी नियंत्रित व्हावी यासासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीनं विशेष व्यवस्थाही केलीय....
पार्श्वभूमी
Mahashivratri 2024 LIVE Updates : आज महाशिवरात्री! हिंदू धर्मियांसाठी हा एक महत्वाचा सण आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी शिवभक्त मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करून विधिवत पूजा करतात. अनेक ठिकाणी विधीवत पूजा करण्यात येतेय, तर काही ठिकाणी दर्शनाच्या लांबच लांब रांगा दिसत आहे. महाशिवरात्रीमिमित्त दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -