Maharashtra Breaking News LIVE Updates : तुळजापुरात लाखो भाविकांचा मेळा; चैत्री पौर्णिमेचा सोहळा, बातम्यांचे लाईव्ह अपडेट्स फक्त एका क्लिकवर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Apr 2022 09:10 PM
 Kolhapur News Update : कोल्हापूरमधील आजरा येथे मधमाशांच्या हल्ल्यात 50 जण जखमी

Kolhapur News Update : कोल्हापूरमधील आजरा येथे मधमाशांच्या हल्ल्यात 50 जण जखमी झाले आहेत. आजऱ्यातील रामतीर्थ परिसरात महाप्रसादावेळी ही घटना घडली आहे. हनुमान जयंती निमित्त महाप्रसादचे आयोजन केले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या भाविकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Vasant More : 3 मे नंतर पुढची भूमिका घेऊ : वसंत मोरे  

Vasant More : " राज ठाकरे यांचा आदेश पाळणार असून ते स्वतः हनुमान चालिसा पठण करणार म्हणजे मी पण करणार. 3 तारखेपर्यंत राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत अल्टीमेटम दिलाय. त्यानंतर पुढची भूमिका घेऊ, असे मनसेचे नेते वसंत मोरे यांनी म्हटले आहे. 

Gunratan Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण 

Gunratan Sadavarte : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता या सुनावणीचा निर्णय येणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी आरोपी संदीप गोडबोले आणि अजित मगरे यांना 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर  आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शिवसेनेची पोस्टरबाजी

Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.  कोथरुडमधील युवा सेनेकडून हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. दादा.. हिमालयात कधी जाता असे या पोस्टर्समधून म्हटले आहे.  

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? 

Chandrakant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आलं आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पराभवामुळे चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल

जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भाजपा नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीडी पोलीस ठाण्यात दिपा चौहान या महिलेकडून गुन्हा दाखल. गेली 27 वर्ष गणेश नाईक यांच्या बरोबर आपले लिव्ह ॲंन्ड रिलेशन मध्ये संबंध असल्याचा महिलेचा आरोप  

Sharad Pawar : शरद पवारांच्या सभेच्या स्टेजवर एका व्यक्तीचा घुसखोरीचा प्रयत्न 

आज शरद पवार यांच्या हस्ते जालन्यातील राजेश टोपे यांच्या अंकुशनगर येथील कारखाना येथे इथेनॉल प्रकल्पाचे उदघाटन होते. या कार्यक्रमाच्या वेळी शरद पवार यांच भाषण सुरू असताना स्टेजवर अचानक एक व्यक्ती सुरक्षा कवच तोडून स्टेज वर चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला पकडण्यासाठी पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सदर व्यक्ती भोळसर असल्याची माहिती मिळतेय.

कोरोना काळात राजेश टोपेंनी आरोग्य सेवक आणि डॉक्टरांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं ; शरद पवारांकडून कौतुक 

Sharad Pawar : जगावर कोरोनाचं संकट अल्यामुळे त्यावेळी लोक बाहेर पडत नव्हते.  त्या काळात महाराष्ट्रातील माणसांना वाचवण्यासाठी आरोग्य सेवक आणि डॉक्टरांनी प्रयत्न केले. त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. मुंबंईतील लोकांना राजेश टोपे माहीत नव्हते. ते मला म्हणत की तुमचा डॉक्टर मंत्री चांगलं काम करत आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्याची मला चिंता नाही, असे कौतुक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.  

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासंदर्भात चर्चा

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यातील कायदा सुव्यवस्था यासंदर्भात चर्चा, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील पावणे एकच्या सुमारास वर्षावरून बाहेर पडले. सव्वा बाराच्या सुमारास ते वर्षा वर पोहोचले होते. कायदा आणि सुव्यवस्थाबद्दल मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

तुळजापुरात लाखो भाविकांचा मेळा; चैत्री पौर्णिमेचा सोहळा

आज चैत्री पौर्णिमा आहे. चार दिवसाच्या सलग सुट्ट्यामुळे तुळजापूरात भाविकांनी गर्दी केली आहे.  लाखो भाविकांच्या उपस्थितीत चैत्री पोर्णिमा सोहळा संपन्न होत आहे. दोन वर्षानंतर चैत्री वारीचा खेटा पूर्ण करता आल्याने भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.  चैत्री पोर्णिमा  सोहळ्यानिमित्त राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी आज श्रीतुळजाभवानीचे दर्शन घेतले. 

मंत्री धनंजय मुंडेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Discharge) यांना आज ब्रीच कॅंडी (Breach Candy Hospital)रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी त्यांना थकवा आणि भोवळ आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळपर्यंत त्यांना आयसीयूमधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. यावेळी अधिक ताणामुळे त्यांना चक्कर आणि थकवा आला होता, अशात अनेक चाचण्या देखील करण्यात आल्या. 

पुण्यात महागाईचा भोंगा, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन

पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भोंगा आंदोलन केलं. या महागाईच्या भोंग्यातून जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. यासाठी थेट पुण्यातील पेट्रोल पंपावरच राष्ट्रवादी काँग्रेसने महागाईचा भोंगा लावला आहे. 

Sanjay Raut : भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला शिकवू नये; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : भाड्याने हिंदुत्व घेतलेल्यांनी आम्हाला शिकवू नये असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. भोंग्याचे राजकारण आजच्या कोल्हापूर पोटनिवडणुकीसोबत संपणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

बीड : गोदावरी पात्रात खंडोबाच्या अभिषेकासाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू
बीड जिल्ह्यातील राजापूर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. निपाणी जवळका येथील रहिवासी असलेले शिवाजी इंगोले आणि मोहन आतकरे हे दोन मित्र आपल्या अन्य मित्रांसोबत खंडोबाच्या यात्रेनिमित्त राजापूर या ठिकाणी गोदावरी पात्रात देवाला अभिषेक करण्यासाठी रात्रीच्या वेळी गंगेचं पाणी आणायला गेले होते. यावेळी हे तरुण खोल पाण्यात बुडाले आणि यामध्ये या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीपासून या दोघांचा गोदावरी पात्रात शोध सुरू होता आणि आता या दोघांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले आहेत. उत्सवाच्या दिवशी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने निपाणी जवळका गावावर शोककळा पसरली आहे.
दापोली खटल्याची सुनावणी आता 2 मे रोजी

केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोलीत दाखल केलेल्या खटल्याची आता सुनावणीची पुढील तारीख 2 मे देण्यात आली आहे. मुरुडमधील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरण केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दापोली न्यायालयात खटला दाखल केला होता. पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा खटला दाखल करण्यात आलाय. पालकमंत्री अनिल परब यांचा हा दावा कोणत्या कोर्टात चालवण्यात यावा यासंदर्भातील तांत्रिक माहिती जिल्हा न्यायालयाकडून मागविण्यात आली आहे. परब हे विद्यमान आमदार आणि मंत्री असल्याने हे तांत्रिक मार्गदर्शन मागवण्यात आले आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील वर्षा बंगल्यावर दाखल, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी दाखल झालेत. राज्यातील कायदा सूव्यवस्था यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहीती मिळतेय.

मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी

मातोश्री बाहेर मोठया संख्येने शिवसैनिक एकत्र आले आहेत. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.





मुंबईकरांची मोठी अडचण, अनेकांची स्टेशन टू स्टेशन पैदल वारी

सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजणार असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून टीएमसी आणि मुंबई महापालिकेला बसेसची संख्या वाढवण्यासाठी आवाहव करण्यात आलं आहे. कल्याण ते सीएसएमटी फास्ट गाड्यांची वाहतूक सुरु करण्यात आलीय. मात्र वेळापत्रक सुरळीत होण्यास काही वेळ जाऊ शकतो. 






 

ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक ट्रेन रांगेत, सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या

माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या एक्सप्रेसच्या अपघातामुळे ऐन गर्दीच्या वेळी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक ट्रेन रांगेत उभ्या असल्याचं चित्र आहे. सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या आहेत.


 





रेल्वे अपघातामुळे स्लो गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं

माटुंगाजवळ रेल्वे अपघातामुळे एक्सप्रेस गाड्या स्लो ट्रॅकवर चालवल्या जात असल्यामुळे स्लो गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरु असून सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजण्याची शक्यता आहे. तर कल्याण ते सीएसएमटी फास्ट ट्रॅकवरील लोकल सुरु असून गाड्या दोन तास उशिराने धावत आहेत. अनेक एक्सप्रेस देखील सरासरी दोन तासाने उशिराने धावत आहेत. सकाळी 7 वाजता दादरला पोहोचणारी महालक्ष्मी एक्सप्रेस सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी पोहोचली.


 





'येळकोट येळकोट जय मल्हार', श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेला सुरुवात

कोल्हापूर : आज कोल्हापूर जिल्ह्यातील वाडीरत्नागिरी म्हणजे जोतिबा डोंगरावर राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली आहे. दख्खनचा राजा म्हणून भक्तांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या देव श्री जोतिबा यांच्या यात्रेचा आजचा मुख्य दिवस. या निमित्तानं लाखो भाविक जोतिबाच्या डोंगरावर दाखल झाले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षे यात्रा रदद झाल्याने यंदा मोठ्या संख्येने भाविक कालपासून जोतिबाच्या डोंगरावर येत आहेत.

20 एप्रिलपासून परशुराम घाट वाहतूुकीसाठी बंद

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण नजीकचा परशुराम घाट 20 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. महामार्ग रुंदीकरणाच्या कामासाठी दुपारी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा घाट वाहतुकीसाठी बंद असेल. यावेळी कमी वजनाच्या गाड्यांची वाहतूक पर्यायी कळबस्ते मार्गाने वळवण्यात येणार असून अवजड वाहनांची वाहतूक 12 ते 5 पूर्णता बंद राहील. मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज ठाकरे आज पुण्यात, मारुती चौकात महाआरती; काय बोलणार याकडे लक्ष

मशिदीवरील भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा देणारे राज ठाकरे येत्या हनुमान जयंतीला काय करणार याच्या चर्चा होत्या. आज हनुमान जयंतीला राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात महाआरती होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज ठाकरे पुण्यात कालच पोहोचले आहेत. पुण्यातील खालकर मारुती चौकात राज ठाकरे यांच्या हस्ते ही महाआरती होणार आहे. एका अर्थी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधी आंदोलनाचा हा श्रीगणेशा असल्याचंच राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आधी मुंबई, नंतर ठाणे आणि आता पुण्यात राजगर्जना होणार आहे. दरम्यान जे पोस्टर मनसेनं बनवलं आहे त्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुजननायक' असा उल्लेख करण्यात आला आहे.

माटुंगा स्थानकाजवळ एक्स्प्रेसचा अपघात, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघाताचा परिणाम मुंबईतील लोकल वाहतूक सेवेवरही दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या गतीच्या मार्गावरून तूर्तास वाहतूक सुरू आहे. शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास माटुंगाजवळ दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले. गडग एक्स्प्रेसच्या इंजिनचे या एक्स्प्रेसला धक्का दिल्याने हा अपघात झाला. रुळावरून घसरलेल्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीचा निकाल


कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. यामध्ये कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 


मनसे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनही आरतीचे आयोजन


हनुमान जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आज पुण्यातील खालकर मारुती चौकात महाआरती होणार आहे. तर शिवसेना आज दादरच्या गोल मंदिरात हनुमानाची आरती करणार आहे. राष्ट्रवादीकडूनही आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज पुण्यातील हनुमान मंदिरात आरती करणार आहेत. अपक्ष खासदार नवनीत राणा आज सकाळी 9 वाजता अमरावतीत हनुमानाच्या प्रतिमेचे पूजन करून हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत.  


ग्राहकांच्या खिशाला कात्री! गोकुळची दूध दरवाढ 
शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं दूध विक्री किंमतीत चार रुपयांची वाढ केली. हे दर 16 एप्रिलपासून म्हणजेच (15 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून) लागू होणार आहेत.


पंतप्रधान मोदी 108 फूट उंच हनुमान मूर्तीचे करणार अनावरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी गुजरतमध्ये हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करणार आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजता गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमानाच्या मूर्तीचे नरेंद्र मोदी अनावरण करतील. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती बसवण्यात येणार आहे.देशभरात भगवान हनुमानाचा चार धाम प्रकल्प उभारला जात आहे. संपूर्ण देशात स्थापित होणारी ही दुसरी मूर्ती आहे. 2010 मध्ये शिमल्यात पहिली मूर्ती बसवण्यात आली होती. तसेच दक्षिणेतील रामेश्वरममध्ये अशीच एक मूर्ती उभारण्यात येणार असून त्याचे काम सुरू आहे.


आयपीएलमध्ये आज डबल धमाका
आयपीएलमध्ये शनिवारी दोन सामने होणार आहेत. दुपारी मुंबईचा सामना लखनौविरोधात होणार आहे. तर रात्री दिल्ली आरसीबीबरोबर दोन हात करणार आहे. मुंबईला सलग पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. शनिवारी मुंबई लखनौविरोधात विजय मिळवत आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरले. तर दिल्ली आणि आरसीबीमध्ये रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि लखनौ यांच्यातील सामना ब्रेबॉन स्टेडिअमवर होणार आहे. तर आरसीबी आणि दिल्ली वानखेडे स्टेडिअमवर दोन हात करणार आहेत.



  • आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज आज हनुमान जयंतीनिमित्त दिल्लीतील भव्य शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.  

  • हिंदूंवरील हल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय कटाबाबत विहिंपचे सरचिटणीस डॉ. सुरेंद्र जैन आज पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. 

  • पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघासह देशातील चार विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.   

  • पंजाबमध्ये आज 300 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली जाऊ शकते. राज्यातील भगवंत मान सरकारला आज एक महिना पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबच्या जनतेसाठी आज मोठी घोषणा होऊ शकते. मान सरकारने महिनाभरात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. 

  • गाझियाबाद : कॅनडातील टोरंटो येथे झालेल्या गोळीबारात ठार झालेल्या कार्तिक वासुदेव या 21 वर्षीय विद्यार्थ्याचे पार्थिव आज दिल्लीत दाखल होणार आहे. कार्तिक हा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी असून तो जानेवारी महिन्यात कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेला होता. सेंट जेम्स टाऊनमधील शेरबोर्न टीटीसी स्टेशनच्या ग्लेन रोड प्रवेशद्वारावर गुरुवारी संध्याकाळी कार्तिकची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

  • पाकिस्तानच्या संसदेच्या अध्यक्षाची आज निवड होणार आहे. उपसभापतींविरोधातील अविश्वास प्रस्तावावरही आज मतदान होणार आहे. 

  • मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली ट्रेन आजच्या दिवशी धावली आहे. 16 एप्रिल 1853 रोजी देशात ही पहिली ट्रेन धावली आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.