Madhya Pradesh's Famous 'Collarwali' Tigress :  मध्य प्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातली (Madhya Pradesh's Pench Tiger Reserve ) सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा (T-15)  मृत्यू झाला आहे.शनिवारी १६ वर्षाच्या या वाघिणीने पेंच व्याघ्र प्रकल्पात अखेरचा श्वास घेतला. सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा रेकॉर्ड या वाघिणीच्या नावावर आहे. या वाघिणीने २९ बछड्यांना जन्म दिला आहे. 


२००५ मधला जन्म -
मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य हे नावलौकिक मिळवून देण्यात कॉलरवाल्या वाघिणीचा मोठा हातभार राहिला आहे. तिचा जन्म सप्टेंबर २००५ मध्ये झाला. फक्त अ़डीच वर्षांची असताना तिने ३ बछड्यांना जन्म दिला. मात्र २४ तासातच त्यांचा मृत्यू झाला होता. २००८ ते २०१३ दरम्यान तिने १८ बछड्यांना जन्म दिला. ज्यातले १४ जिवंत राहिले. २०१५ मध्ये तिने अजून ४ बछड्यांना जन्म दिला. आतापर्यंत ८ वेळा तिने २९ बछड्यांना जन्म दिला आहे. ११ मार्च २००८ रोजी भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनमधल्या तज्ज्ञांनी या वाघिणीला रेडियो कॉलर घातली होती. तेव्हापासून कॉलरवाली वाघिण म्हणून तिला ओळखलं जावू लागलं. पर्यंटकांना सर्वाधिक नजरेस पडणारी ती वाघिण होती. या कॉलरवाल्या वाघिणीवर टायगर स्पाय इन द जंगल हे डॉक्युमेंट्रीही तयार केली गेली आहे. पेंचची राणीही म्हणूनही ती प्रसिद्ध होती.


वृद्धापकाळामुळे मृत्यू - 
गेल्या काही आठवड्यांपासून कॉलरवाली वाघिण अशक्त झाली होती. पेंच व्याघ्र प्रकल्पात तिची देखभाल केली जात होती. तिला कुठल्याही प्रकारचा आजार किंवा इजा झालेली नव्हती. शनिवारी सूर्यास्तावेळ सीताघाटजवळच्या भूरादत्त ओढ्याजवळ तिने अखेरचा श्वास घेतला. 



महत्वाच्या बातम्या :



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live