Wardha Kadam Hospital Abortion Case: वर्धेतील कदम रुग्णालयाच्या परिसरात मानवी कवट्या आणि काही अवशेष आढळल्यानं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयाच्या डॉ नीरज कदमला अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी नीरजला ताब्यात घेतलं. या प्रकरणात अटक झालेल्याची संख्या आता सहा झाली आहे. या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येण्याची होण्याची शक्यता आहे.  इथले सोनोग्राफी सेंटर हे डॉ. रेखा कदम आणि डॉ.नीरज कदम या दोघांच्या नावाने असल्याची माहिती आहे.   पोलिसांनी तपासादरम्यान डॉ. रेखा कदम हिला सुरुवातीलाच अटक केली होती.   पोलिसांनी गोबरगॅसच्या खड्ड्यातून 12 कवट्या अन् 54 हाडं जप्त केली होती. 


बुधवारी पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गोबरगॅसच्या खड्ड्याची तपासणी केली होती. त्यात पोलिसांना 11 कवट्या 54 हाडे बायोमेडिकल वेस्ट मटेरियल आदी मिळाल होतं.. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाचा सखोल अभ्यास करत तपासासाठी वेगळे पथक स्थापन केले. पोलिसांच्या चमूने वर्धा आणि नागपूरच्या फॉरेन्सिक चामुंच्या मदतीने पुन्हा रुग्णालय परिसरातील तपासणी केली.  दरम्यान रुग्णालयाच्या मागील परिसरातून परत एक कवटी आढळल्याचं पोलीसांनी सांगितलं. 


आर्वीच्या डॉ. कदमच्या घरातून मिळाली काळविटाची कातडी 
डॉ. कदमच्या घरामधून तपासणीदरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी हॉस्पिटल गाठून कातडी जप्त केलीय.  गर्भपात प्रकरणाच्या अनुषंगानं पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती. त्यावेळी पोलिसांकडून घर झडती सुरू होती. येथून कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळालीय. यावेळी पोलिसांना वन्यप्राण्याची कातडी आढळून आली. ही माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.  वनविभागाच्या चमूनं हॉस्पिटल गाठून पंचनामा करत कातडी जप्त केलीय.  प्रथमदर्शनी ही कातडी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. 


काय आहे प्रकरण? 


आर्वीतील 13 वर्षीय मुलगी एका 17 वर्षीय मुलासोबत झालेल्या शारीरिक संबंधांतून गर्भवती झाली होती. या प्रकरणाचा आरोपी असलेल्या 17 वर्षीय मुलाच्या आई वडिलांच्या दबावात मुलीच्या आई-वडिलांनी अवैध गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचे पैसेही आरोपी मुलाच्या आई-वडिलांनीच डॉ. रेखा कदम यांना दिले. त्यानंतर डॉक्टर रेखा कदम यांनी चार जानेवारीला 13 वर्षीय मुलीला कदम हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं. सहा जानेवारीला तिचा गर्भपात केला. त्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीनं गर्भपात झालेलं अर्भक कदम रुग्णालयाच्या आवारात रुग्णालयाच्या इमारतीच्या पाठीमागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत टाकून दिलं.


इतर महत्वाच्या बातम्या



धक्कादायक! वर्ध्यातल्या रुग्णालयातील 'दफनभूमी'; रुग्णालयाच्या आवारात गर्भपात केलेल्या अर्भकांचे अवशेष


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha