Indore : इंदूरच्या मंदिर दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू
Indore : इंदूरच्या मंदिर दुर्घटनेत आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे.
Indore : इंदूरच्या मंदिर दुर्घटनेतील (indore temple stepwell collapses) मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत या दुर्घटनेत 35 जणांचा मृत्यू (35 people died) झाला आहे. तर 18 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, NDRF आणि SDRF ची पथकांकडून बचावकार्य सुरु आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेल नगर भागात असणाऱ्या मंदिरात काल (30 मार्च) रामनवमीच्या उत्सवादरम्यान भाविकाची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंदिर परिसरात असलेल्या विहिरीवरील छतचा काही भाग कोसळल्यानं ही दुर्घटना घडली होती.
दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश
दरम्यान, इंदूरच्या या मंदिर घडलेल्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, या घटनेत काल 13 जणांचा मृत्यू झाला होता. आज हा मृतांचा आकडा वाढला आहे. आत्तापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे.
Stepwell collapse at Indore temple | Death toll rises to 35
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 31, 2023
18 people were admitted to the hospital, out of which 2 people have been discharged. 35 people died. One person is still missing. Army, NDRF & SDRF teams are conducting search & rescue operation: Indore Collector Dr… pic.twitter.com/3Ff6VzAkXs
नेमकी दुर्घटना घडली कशी?
मध्य प्रदेशातील इंदूरमधील पटेलनगर भागातील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात रामनवमीच्या उत्सवादरम्यान भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरातील प्राचीन बावडीच्या (मोठी विहीर) छतावर मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी विहिरीवरील छत कोसळल्याची घटना घडली. आत्तापर्यंत या घटनेत 35 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये महिलांचाही समावेश आहे. या अपघातानंतरही बराच वेळ अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचलेल्या नव्हत्या. तर या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, नगरसेवक यांच्यासह प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. इंदूरमध्ये घटलेल्या दुर्घटनेने अत्यंत दु:ख झालं आहे. मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. राज्य सरकार जलद गतीने बचाव आणि मदत कार्य करत आहे. सर्व बाधित आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत माझी प्रार्थना, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती.
विहीर 50 फूट खोल
रामनवमीच्या निमित्ताने मंदिरात यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सहभागी होण्यासाठी लोक मोठ्या संख्येने मंदिरात हजर होते. लोक पूजा अर्चा करत होते. या मंदिरात एक विहिर होती. ज्यावर दहा वर्षांपूर्वी छत टाकण्यात आलं होतं. पूजेच्या वेळी 20 ते 25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, त्याच वेळी छत खचलं. छत कोसळल्याने सर्वजण विहिरीत पडले. दरम्यान ही विहीर सुमारे 50 फूट खोल असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: