एक्स्प्लोर

मध्यप्रदेश विधानसभा : शंभरपेक्षा जास्त ईव्हीएममध्ये बिघाड

यासंबंधी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्या मतदान केंद्रावर कॉंग्रेसच्या बाजूने मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्या आहेत, असा दावा कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये आज झालेल्या विधानसभेच्या मतदानादरम्यान 100 हून अधिक ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंबंधी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ज्या मतदान केंद्रावर कॉंग्रेसच्या बाजूने मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्या आहेत, असा दावा कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. बिघाड झालेल्या ईव्हीएम मशीन नंतर बदलण्यात आल्या, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे . पसरवाडा,लांजी आणि बेहर या तीन मतदार संघात सकाळी 7 तर 227 मतदारसंघात सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. कॉंग्रेस बूथ प्रतिनिधींनी बिघाड झालेल्या मशीनच्या जागी ज्या मशीन बसवण्यात येणार आहे, त्यांचा नंबर नोंद करुन घ्यावा, तसेच नवीन मशीनने मतदान प्रक्रिया सुरु करण्यापूर्वी मतदान करुन पहावं, अशा सूचना दिग्विजय सिंह यांनी दिल्या होत्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी ईव्हीएममध्ये बिघाड झालाच कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोठ्या संख्येने ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदानावर परिणाम होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठी रांग लागली होती. तरी निवडणूक आयोगाने यासंबंधी निर्णय घेऊन, तात्काळ बंद मशीन बदलाव्या, अशी मागणी कमलनाथ यांनी केली होती. दरम्यान ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी जोरदार हल्लाबोल केला. ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केल्याने कॉंग्रेसला पराभवाची चिन्हे दिसू लागली आहे, असा टोला त्यांनी लगावला. आता पाच वर्ष कमलनाथ ईव्हीएम बद्दल ट्वीट करत राहतील, असे ते म्हणाले. दरम्यान सायंकाळी 5 वाजेपर्यंत या निवडणुकीत विक्रमी 65.5 टक्के मतदान झालं असून, 11 डिसेंबरला या निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
दिल्लीच्या आंदोलनाची संयुक्त राष्ट्राने घेतली दखल, आंदोलकांना तात्काळ सोडा, संयम बाळगा, अधिकाऱ्यांना सूचना
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
सरकार घाबरलंय, आंदोलन शक्तीशाली! 40 हजार निमलष्करी जवान तैनात करावे लागले, प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य 
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं

आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget