(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Madhya Pradesh : उभ्या असलेल्या डंपरमध्ये खासगी बस घुसल्याने 9 जणांचा जागीच अंत; जेसीबी, गॅस कटरने बस कापून प्रवाशांना बाहेर काढले
धडक इतकी जोरदार होती की बसचा चक्काचूर झाला. अनेक प्रवासी बसमध्येच अडकले. बचावासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. बसचा दरवाजा गॅस कटरने कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील मैहरमध्ये शनिवारी रात्री उशिरा प्रवासी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवा डंपरला धडकली. या अपघातात 2 वर्षाच्या मुलासह 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात 24 जण जखमी झाले. त्यांना मैहर, अमरपाटन आणि सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर नादन देहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. आभा ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच बस (UP72 AT 4952) प्रयागराजहून रीवामार्गे नागपूरला जात होती. बसचा वेग जास्त होता. दरम्यान, चौरसिया ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मोठ्या डंपरला म्हणजेच हायवेवर (CG04 NB 6786) धडकली. 53आसनी बसमध्ये 45 प्रवासी होते.
मैहर जिले में ट्रक और उत्तर प्रदेश की यात्री बस के बीच हुई भीषण टक्कर में 10 यात्रियों की असामयिक मृत्यु एवं कई यात्रियों की घायल होने की खबर अत्यंत दुखद और हृदय विदारक है। इस दुर्घटना ने कई परिवारों को गहरे शोक में डाल दिया है।
— Narayan Tripathi (@Narayan_Maihar) September 29, 2024
मां शारदा से प्रार्थना है कि दिवंगत आत्माओं को… pic.twitter.com/pDohKUk27v
बचावासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली
माहिती मिळताच नादान आणि मैहर पोलिसांनी एसडीएम विकास सिंह, तहसीलदार जितेंद्र पटेल आणि एसपी सुधीर कुमार अग्रवाल यांच्यासह घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जखमींपैकी 9 जणांना अमरपाटण, 7 जणांना मैहर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तर 8 जणांना सतना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की बसचा चक्काचूर झाला. अनेक प्रवासी बसमध्येच अडकले. बचावासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. बसचा दरवाजा गॅस कटरने कापून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास बचावकार्य पूर्ण करण्यात आले. जेसीबी आणि गॅस कटरच्या सहाय्याने बस कापून प्रवाशांना बाहेर काढता आले.
रीवा से नागपुर जा रही आभा ट्रैवल्स की बस खड़े ट्रक से टकराई । हादसे में 10 लोगों की मौत की खबर वहीं 25 से अधिक लोग घायल बताए जा रहे हैं । घटना मैहर के नादन देहात थाना थाना क्षेत्र की। #maihar #busaccident #maiharbusaccident #मैहर pic.twitter.com/Ya8B2paLA9
— Shivam Dwivedi (@Shiv__am_) September 28, 2024
इतर महत्वाच्या बातम्या